Abhijit Dipke : आंदोलनाला मोठं यश, अभिजित दीपकेच्या घरी लग्नासाठी मुलींच्या रांगा, आईनेही सांगितल्या अपेक्षा…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर आता त्यांच्या घरी लग्नासाठी मुलींची अनेक स्थळे येत असल्याचं अभिजित दीपकेच्या आईने सांगितलंय.

abhijit dipke

abhijit dipke

Abhijit Dipke News : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर आता त्यांच्या घरी लग्नासाठी मुलींची अनेक स्थळे येत आहेत. अभिजित दीपके यांच्या लग्नासंदर्भात खुद्द अभिजितने अद्याप कोणतीही टिप्पणी केली नसून अभिजितच्या आईने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढंच नाही तर अभिजितच्या आईने आपल्या कशी सुन हवी आहे? याबाबतही खुलासा केला आहे. त्यामुळे आता आंदोलनानंतर अभिजितच्या लग्नाचा विषय राज्यभर चर्चेत येत आहे.

नीट पेपर लिकनंतर अभिजित दीपके याने दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी दीपकेची साथ दिली. पाहता पाहता हे आंदोलन इतके मोठे झाले की देशभरात सुरु झाले. या आंदोलनाचा शेवट केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने झाला. त्यानंतर एक युवा नेता म्हणून अभिजित दीपकेची देशभरात ओळख निर्माण झाली. त्यानंतर आता अभिजितच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

वैधृती योग आणि सोमवार शिवपूजनाचा योगायोग, जाणून घ्या आजचा दिवस 12 राशींसाठी कसा राहील

अभिजितच्या आईने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, अभिजितने जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर त्याच्या लग्नासाठी अनेक प्रस्ताव येत आहेत. अनेकांचे फोन येत आहेत, परंतू योग्य वेळ आल्यानंतरच आम्ही अभिजितच्या लग्नाचा विचार करु. अभिजितला आधी या सर्व गोष्टींमधून सावरु द्या. माध्यमांकडून अभिजितच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर अभिजितच्या आईने स्मितहास्य करत उत्तर दिलं आहे.

तसेच माध्यमांकडून तुम्हाला कशी सून पसंत पडेल, असा सवाल केल्यानंतर त्या म्हणाल्या, पूर्वी मला खूप साधी आणि साध्या स्वभावाची सून हवी होती. पण आता अभिजीत ज्या पदावर पोहोचला आहे, त्या पाहता त्याला आपली जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही त्याच्या निर्णयाला पाठिंबा देऊ. काळ बदलला आहे. आताचा काळ असा नाही की, केवळ पालकांनी सांगितले म्हणून लग्न केले जावे. आजच्या पिढीची मानसिकता वेगळी असल्याचं अभिजितच्या आईने स्पष्ट केलंय.

दिल्लीतील आंदोलन संपताच पालकमंत्री शिरसाट अभिजीत दिपकेंच्या घरी…, कुटुंबाच्या भेटीचं काय दिलं कारण?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी देशातील तरुण पिढीला झुरळ असे संबोधल्यानंतर अभिजित दीपके याने इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टी नावाने अकाऊंट उघडले. अल्पावधीतच दीपकेच्या अकाऊंटचे फॉलोअर्स भाजप आणि कॉंग्रेसच्या तुलनेत अधिक झाले. त्यानंतर नीटच्या मुद्द्यावरुन अभिजित दीपकेने जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना सोबत घेत आंदोलन केलं. अभिजितला साथ दिली सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी. वांगचूक यांनी 26 दिवस उपोषण केले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडले. परंतू अभिजितने आंदोलन सुरुच ठेवले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आंदोलन थांबवले.

Exit mobile version