मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील मोठ नाव (Accident) असेलेल दत्त सांप्रदायाचे कालिदास महाराज यांचं निधन झालं आहे. आज शुक्रवार (दि. 17 जुलै)रोजी आज बीड बायपास परिसरात झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले. या दुर्दैवी अपघातात महाराजांसह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि आध्यात्मिक विश्वास तीव्र शोककळा पसरली आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंजचे कालिदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुजरात येथील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन आटपून आपल्या सहकाऱ्यांसह ते वाहनाने गुंजकडे परत येत होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांनी घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मी 20 तारखेपर्यंत जिवंत राहील 20 दिवसांच्या उपोषणानंतर असं का म्हणाले सोनम वांगचुक?
कालीदास महाराज मूळचे परभणी जिल्ह्यातील बोरी गावचे रहिवासी होते. बालपणी त्यांना सावत्र आईकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर ते गुंज येथील चिंतामणी महाराज यांच्याकडे गेले. महाराजांकडे स्वतःची व्यथा मांडली. चिंतामणी महाराजांनी आणखी त्रास होऊ नये म्हणून मौनव्रताचा सल्ला दिला. हा सल्ला कालीदास महाराजांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तंतोतंत पाळला.
तब्बल ४० वर्षे त्यांनी अवाक्षरही उच्चारले नाही. महाराज सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यायचे आणि त्यांचे म्हणणे मोजक्या आणि अचूक शब्दात एका डायरीत लिहून दाखवत होते. संवादाची ही पद्धत त्यांनी मौनव्रत धारण केल्यापासून अखेरच्या संवादापर्यंत जपली. डोळ्यांतील करूणा आणि डायरीतून संवाद साधत कालीदास महाराजांनी हजारो भाविकांना व्यसनमुक्ती, सदाचार, लोककल्याण यांचा मार्ग दाखवला. यामुळेच कालीदास महाराजांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले.
