Nasrapur Rape and Murder Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे दिवशी चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी प्रकरणाचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. तु तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं आरोपीला न्यायालयाने विचारले.
तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाची मागणी केली असून मृत्युदंड न दिल्यास आरोपी तुरूंगात आणखी गुन्हे करू शकतो असं सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे. न्यायालय सोमवार 29 जून रोजी आरोपी भीमराव कांबळे याला शिक्षा सुनवणार आहे.
प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर (Nasrapur Rape and Murder Case) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 1 मे रोजी अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली होती.
घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला त्याने फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचून तिचा खून केला. या कृत्यानंतर त्याने चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला, जेणेकरून हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये. दुपारच्या सुमारास चिमुरडी अचानक दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी चिंतेतून शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांनीही शोधमोहीम राबवली.
काही वेळानंतर गोठ्यात संशयास्पद परिस्थितीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले. या पुराव्यामुळे संशय अधिकच बळावला आणि आरोपीचे नाव पुढे आले. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले होते.
या प्रकरणात सीसीटीव्ही, वैद्यकीय पुरावे, न्यायावैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष अशा विविध बाजूने तपास करुन 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याचबरोबर आरोपपत्रासोबत 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीला 21 मे पासून सुरुवात झाली होती.
पासपोर्ट नाही, मग भारतीय नागरिक म्हणून ओळख सिद्ध करणारे दस्तऐवज कोणते?
