नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण हादरलं; नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नसरापूरमधील क्रूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
नसरापूरमधील क्रूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये अशीच संताप निर्माण करणारी घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलीला कल्याणहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जायचं होतं. त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपुर्वीच पुण्याच्या नसरापूर येथे अशीच क्रूर घटना घडली होती. त्यानंतर मोठा संताप लोकांमध्ये निर्माण झाला. परंतु, काही दिवसांतच पुन्हा अशा घटना घडत असल्याने नागरीक आता जास्तच सत्पत झाले आहेत.