Download App

‘तो’ आरोपी आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; बंधू अन् अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे पडसाद आता संपूर्ण जिल्हाभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांनी

  • Written By: Last Updated:

Beed Crime : बीड जिल्ह्यात खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ आणि छेडछाड प्रकरणाने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. (Beed) विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात फॉक्स अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे पडसाद आता संपूर्ण जिल्हाभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांनी शैक्षणिक बंद पुकारला आहे. अल्पवयीन मुलीच्या छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार याला राजकीय पाठबळ असून आमदार संदीप क्षीरसागर यांचा तो राईट हॅन्ड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांचे भाऊ व अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.

सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक

घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.

मागील दोन वर्षात बीड वेगळा वळणावर असताना ही घटना शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी आहे. ही घटना झाल्यानंतर यातील शिक्षक रात्री लोकप्रतिनिधींच्या घरी होता आणि त्या ठिकाणाहून यंत्रणेला फोन देखील केला. यातील फराळ आरोपी अजून का पकडले गेले नाही त्याचा तपास कोणा गरजेचं कोणा कोणाचा दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला? ज्या लोकांसोबत हे शिक्षक राहतात त्यांच्याकडून कितपत पाठिंबा त्यांना दिला गेला आहे हे शोधून काढणं गरजेचे आहे.

follow us