Beed Crime : निधी देण्याचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा, आमदाराच्या पीएचा कारनामा…

Beed Crime : निधी देण्याचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा, आमदाराच्या पीएचा कारनामा…

Beed Crime News : राज्यात फसवणूकीचे (Fraud) प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. आता चक्क एका आमदाराच्या पीएनेच एक कोटींचा निधी मिळवून देतो, असं सांगत एका जणाची तब्बल सात लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देतो असं आमिष दाखवत तब्बल सात लाख रुपयांचा या पीएने गंडा घातला.

China : खोटं बोललात तर अकाउंट बंद! चीनच्या जिनपिंग सरकारचा कठोर नियम; काय होणार?

मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे (MLA Vikram Kale)  यांच्या पीएने हा फसवणूक केल्याचं समोर आलं. 25/11 लेखाशीर्ष मधून सिमेंट रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देतो, म्हणून सहा लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद आमदार काळे यांच्या पीएविरोधात शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. उत्तरेश्वर कारभारी खताळ (वय 30, राहणार कान्हापूर, तालुका वडवणी) यांनी ही फिर्याद दिली. त्यानुसार नयन जयराम शेजुळ (राहणार छत्रपती संभाजी नगर) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

‘आमी डाकिनी’ मधील भूमिकेसाठी राची शर्माने घेतली श्रद्धा कपूरकडून प्रेरणा 

नयन शेजुळ हा मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांचा खाजगी सचिव असल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

सविस्तर माहिती अशी की, उत्तरेश्वर खताळ यांच्या पत्नी राधा खताळ या सरपंच आहेत. 2024-2025 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांच्या टेंडरसाठी आमदार विक्रम काळे यांचे पीए नयन जयराम शेजूळ यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता. बनावट मेलद्वारे टेंडर उपलब्ध करून देतो, असं सांगून एक कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी एक दोन नव्हे तर तब्बल दहा लाख रुपयांची मागणी शेजूळ यांनी केली होती.

त्यानुसार, शेजूळ यांनी ऑगस्ट 2024 मध्ये जिल्हा परिषद आवारात 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संभाजीनगरला बोलवून घेत सुहास लंगडे व समीर बशीर शेख यांच्या समक्ष सहा लाख 20 हजार रुपये घेतल्याचं उत्तरेश्वर खताळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube