Download App

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही सोडेना…

मुंबई : गद्दार गद्दारी करण्यासाठी कारणं देत असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र होतं, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता.

अभिनेता सुबोध भावेकडून मराठी राजभाषा दिनाच्या खास शुभेच्छा

त्यावर आदित्य ठाकरेंनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलंय. हे गद्दारांचं बारावं कारण आहे, गद्दार गद्दारी करण्यासाठी कारणं देत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आज विधीमंडळाच्या अर्थिक अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणात त्यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामावरच भाषण केल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

Italy येथील स्थलांतरित जहाजाच्या दुर्घटनेत 30 हून अधिक मृत्यू तर 40 जणांचे वाचले प्राण

तसेच मागील वेळी जे मुद्दे राज्यपालांनी मांडले होते, तेच मुद्दे आज राज्यपालांनी पुढे मांडले आहेत. राज्यापालांची कुठेतरी दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जाची मागणी महाविकास आघाडीचे खासदार, आमदार करीत आहेत. त्यासाठी विलंब का लागत आहे हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

”विधानसभेत फिरण्यासाठी कुणी बंदी आणू शकत नाही… ; ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा इशारा कुणाला ?

दरम्यान, काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेत आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु असून नूकतीच आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या सभेतून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत टीका केली होती. टीका करताना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा कायमच गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे.

Tags

follow us