Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे तक्रार

Aditya Thackeray On CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांची भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाबाहेर (Raj Bhavan)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी तीन घोटाळ्याची माहिती दिली आहे.

Maharashtra Political Crises : राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार?

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या सहा ते सात महिण्यांमध्ये मुंबई महापालिकेचे अनेक घोटाळे आम्ही मीडियाच्या माध्यमातूनच जनतेसमोर आणले आहेत. मग तो रस्त्यांचा घोटाळा असो, खाडीचा घोटाळा झालेला आहे तो, आणि स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आहे. या तीन घोटाळ्यांची माहिती राज्यपाल महोदयांना द्यायची होती ती आम्ही दिली आहे.

आपल्याला सर्वांना माहित आहे की, गेल्या सात आठ महिण्यांमध्ये आत्ताचे महापालिकेचे प्रशासक आहेत , त्यांच्या अंदाधुंद कारभारामुळे मुंबईत होत आहेत. एकीकडे 40 टक्के सरकार आणि बाजूला आमच्या बाजूला बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार बसलेलं आहे. 40 टक्के सरकारचं जे काही होईल त्याच्यात आम्हाला काही जायचं नाही. पण आमच्या राज्यात बिल्डर कॉन्ट्रॅक्टर जे बसलेलं आहे.

त्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरच्या सरकारमुळं मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा होत आहे. हे जेव्हा जानेवारीमध्ये टेंडर आले, त्याला वर्कऑर्डर दिल्या गेल्या, त्यात आपल्याला सांगितलं होतं की, 900 रस्ते म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते हे सिमेंट कॉंक्रेटचे होतील. आता या 900 रस्त्यांमधील 10 रस्तेही झाले असतील असं मला वाटत नाही, आणि ते रस्ते 31 मेपूर्वी पूर्ण होणार नाहीत, असंही यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

याच्यासाठी सर्वांनीच पत्र दिले आहेत, मग त्याच्यात काही भाजपचे असतील, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असतील, फक्त गद्दार गॅंगचे नेते सोडून इतर सर्वांनीच पत्र दिले आहेत, मात्र प्रशासकांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

खाडीचा घोटाळा मी आपल्या समोर आणला. एक कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव आपल्या सर्वांना माहित आहे. असं म्हटलं जातं की, सीएम म्हणजे जे करप्टमॅन आहेत. त्यांच्या जवळचे कोणीतरी या संपूर्ण रॅकेटमध्ये आहेत. पण याच एका कंपनीमुळे तीन आठवडे मुंबईची कामं बंद होती. मग गोखले रोडचे असेल, डिलाय रोडचे असेल, ही सगळी महत्वाची कामं बंद होऊन साधारण पावसाच्या आधी ही कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कोणतीही कामं पूर्ण होणार नाहीत, असं दिसत आहे. आणि तीनशे रुपये प्रतिटनवरुन साधारणपणे 600 रुपये प्रतिटन एवढी किंमत वाढली आहे.

Tags

follow us