11th Admission : नुकतंच दहावीचा निकाल जाहीर झाला असून आजपासून (21 मे) अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते मात्र ऑनलाईन प्रवेश (11th Admission Online Process ) प्रक्रियाच्या पहिल्या दिवशी वेबसाईट बंद पडल्याने विद्यार्थांना आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे वेबसाईटवर काम सुरु असून लवकरच वेबसाईट सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
21 मे पासून अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार होती मात्र अचानक राज्य शासनाची वेबसाईट बंद पडल्याने विद्यार्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थांना एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. 28 मे रोजी प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे. त्यामुळे विद्यार्थांना एका आठवड्यात अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन अर्ज प्रक्रियाचे पहिल्याच दिवशी वेबसाईट बंद पडल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पसंती देऊ शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज
तर दुसरीकडे यंदा राज्यात दहावीच्या परिक्षेत 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यामध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी 20 लाख 91 हजार 390 जागा असून या जागांसाठी 21 मे पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यात प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा