घरासाठी अर्ज भरला अन् 50 हजारांना फसला; म्हाडाची फेक वेबसाईट समोर

घरासाठी अर्ज भरला अन् 50 हजारांना फसला; म्हाडाची फेक वेबसाईट समोर

Mhada Fake Website : म्हाडा गृहनिर्माण संस्थेकडून (Mhada) 30 हजार घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलीयं. त्यासाठी अनेक नागरिकांकडून म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यात येत आहेत. तुम्ही देखील अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असाल तर सावधानी बाळगा, कारण म्हाडाचीही फेक वेबसाईट (Mhada Fake Website) समोर आल्याचं समोर आलं आहे. एका नागरिकाची या फेक वेबसाईवरुन अर्ज दाखल करुन 50 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकारामुळे एकच खबळब उडालीयं.

मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

म्हाडाने घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये घरांच्या किंमतीही दिल्या आहेत. मुंबईसह इतर शहारांमध्ये म्हाडाच्या घराची योजना सुरु आहे. शहरातील विविध भागातील ही घरं असून प्रत्येक ठिकाणच्या घराची किंमत वेगवेगळी आहे. म्हाडातून कमी किंमतीत घर मिळावं या अपेक्षेने अनेकजण म्हाडाच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करीत असतात. आजतागायत म्हाडाच्या वेबसाईटवरुन कोणत्याही नागरिकाची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं नाही. मात्र, एका नागरिकाची म्हाडाच्या फेक वेबसाईटमुळे 50 हजारांची फसवणूक झाली आहे.

Ritiesh Deshmukh : ‘मराठीला पहिल्यांदा ‘बिग बॉस’ हा खेळ उमजलेला होस्ट लाभला’, किरण मानेंची रितेशसाठी खास पोस्ट

Mhada.gov.in ही म्हाडाची अधिकृत वेबसाईट आहे. मात्र, फसवणूक झालेल्या नागरिकाने Mhada.Org या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज दाखल केला. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल केल्यानंतर पैसे भरावे लागतात मात्र, या फेक वेबसाईटवरुन या नागरिकाला सुरुवातीलाच 50 हजार रुपये भरावे लागले आहेत. पैसे भरल्यानंतर या नागरिकाला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. या प्रकरणी नागरिकाने म्हाडाकडे तक्रार दाखल केल्यानंतर म्हाडाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आलीयं.

इस्रायलवर पुन्हा हल्ला, हमासने डागले M90 Rocket, जाणून घ्या ‘या’ रॉकेटबद्दल सर्वकाही

फेक वेबसाईट तयार झाल्याचं समजताच म्हाडाकडून सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीयं. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांनी फेक वेबसाईट करणाऱ्यांविरोधाक गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरुनच ऑनलाईन अर्ज दाखल करावा, असं आवाहन अतुल सावे यांनी केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube