Ritiesh Deshmukh : ‘मराठीला पहिल्यांदा ‘बिग बॉस’ हा खेळ उमजलेला होस्ट लाभला’, किरण मानेंची रितेशसाठी खास पोस्ट

Ritiesh Deshmukh : ‘मराठीला पहिल्यांदा ‘बिग बॉस’ हा खेळ उमजलेला होस्ट लाभला’, किरण मानेंची रितेशसाठी खास पोस्ट

Riteish Deshmukh Bigg Boss Marathi : मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिझनची (Bigg Boss Marathi New Season) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक (Bigg Boss Marathi ) गोष्टीसाठी होणारी भांडणं, राडा या सर्वच गोष्टींमुळे या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच वीकेंडला रितेश भाऊ (Riteish Deshmukh) ज्या प्रकारे घरातल्या स्पर्धकांची शाळा घेतो ते देखील प्रेक्षकसांठी चांगलच मनोरंजन ठरत आहे. त्यामुळे रितेशच्या भाऊच्या धक्क्याच्याही प्रेक्षकवर्ग मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात.

बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राईज मिळालं. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट म्हणून बिग बॉसच्या खुर्चीत बसला. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही मनात खूपच उत्सुकता निर्माण झाली. त्यातच रितेशचा भाऊचा धक्का देखील प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत आहे. या सगळ्यावर अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली खास पोस्ट सध्या चर्चा विषय बनला आहे.


अभिनेते किरण मानेंची खास पोस्ट

रितेश ! हॅटस् ऑफ भावा…. कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीनं बिगबाॅस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा ‘बिगबाॅस’ हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही. केवळ ‘स्वत:ला आवडतात म्हणून’ न खेळणार्‍या निष्क्रीय लोकांना डोक्यावर घेणे नाही. सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं. आरशासारखं. लख्ख.

मुळात तू स्वत: ‘माणूस’ म्हणून नितळ आहेस. तो नितळपणा तुझ्या सुत्रसंचालनात उतरला आहे. बिगबाॅस हा खेळ सायकाॅलाॅजीकल आहे. विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं ‘व्यक्तीमत्त्व’ परखण्याचा आहे, याची जाणीव सतत तुला असते, ही तुझी ‘युनिक’ क्वाॅलिटी आहे. बिगबाॅस हे असं ‘रामायण’ आहे, ज्यात एकाच माणसात असलेली राम-रावण-सीता-कैकेयी-लक्ष्मण-बिभिषण-भरत-दशरथापास्नं हनुमानापर्यन्त सगळी व्यक्तीमत्त्वं बाहेर पडतात. कधी कुणातली कैकेयी भारी ठरते,तर कधी कुणी बिभिषण ठरतो. माणूसपणाची कसोटी पहाणारा अद्भूत डाव सुरू होतो. यावेळी यांना खेळवणारा, झुलवणारा, चकवणारा, झुंजवणारा आणि फुलवणारा जादूगार फार महत्त्वाचा असतो… रितेश देशमुखच्या रूपानं यावेळी सिझन पाचला असा भन्नाट ‘खेळीया’ लाभलाय, ज्यानं या सिझनला चार चांद लावलेत !

Bigg Boss Marathi: घरात आलेल्या दोन छोटे पाहुण्यांमुळे, निक्कीचं ‘बाई’ झालं ‘आई’

रितेशभौ, ‘बिगबाॅस’ माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे. मला जीवदान देणारा ऑक्सीजन आहे तो. कुणी निंदा कुणी वंदा, पण माझा जीव आहे या शो वर. तू ज्या पद्धतीनं हा शो होल्ड केलास ते पाहून तुझा खुप अभिमान वाटायला लागलाय. हा सिझन जर नव्या उंचीवर गेला, तर त्यात सिंहाचा वाटा हा तुझ्यातल्या निर्मळ ‘माणसा’चा असेल. लब्यू, अशी खास पोस्ट अभिनेत्याने रितेश भाऊसाठी लिहिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube