मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. बोहरा समाजाचे धर्मगुरु सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत असून बोहरा समाज आमच्या पाठीशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनीही बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते बोहरा समाजाच्या सैफी संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
Uddhav Thackeray : बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं?
ठाकरे आणि बोहरा समाजाचे धर्मगुरु यांच्या भेटीने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. याआधी मोदींनी बोहरा समाजासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं.
Adani Enterprises ने तिसऱ्या तिमाहीत कमवला 820 कोटींचा नफा
त्यावेळी मोदी म्हणाले होते की, माझे भाग्य असे आहे की मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Jyotiraditya Scindia : भाजप खासदाराने मंत्र्यांना सुनावले.. म्हणाले, ‘माझी हात जोडून विनंती की…’
दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी देखील धर्मगुरूंची आज भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपर्यंत या भेटीबाबत कुठलीही माहिती नव्हती. मात्र अचानक ठाकरे कुटुंबाने आज बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.