Adani Enterprises ने तिसऱ्या तिमाहीत कमवला 820 कोटींचा नफा

  • Written By: Published:
Adani Enterprises ने तिसऱ्या तिमाहीत कमवला 820 कोटींचा नफा

मुंबई : अदानी समूहाची (Adani Group) सर्वात मोठी कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसने जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

वर्ष 2021 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला 11.63 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण यावेळी सप्टेंबर-2022 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 460 कोटींचा नफा कमावला होता. तर आता ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. त्याचबरोबर महसुलातही 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या उत्कृष्ट निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे.

कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 42% वाढून 26,612 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 18,758 कोटी रुपये होते. त्याचवेळी, कंपनीचा एकूण खर्च वाढून 26,171 कोटी झाला. जो एका वर्षांपूर्वी (YoY) 19,047.7 कोटी होता.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) म्हणाले की, गेल्या तीन दशकांमध्ये अदानी एंटरप्रायझेसने केवळ भारतातील सर्वात यशस्वी पायाभूत सुविधा केंद्र म्हणून आपले स्थान बळकट केले नाही, तर मुख्य पायाभूत सुविधा व्यवसाय देखील वाढवला आहे.

अदानी पुढे म्हणाले की, सध्याची बाजारातील अस्थिरता तात्पुरती आहे. दीर्घकालीन मूल्य निर्मितीच्या दृष्टीने एक इनक्यूबेटर म्हणून अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड विस्तार आणि वाढीसाठी धोरणात्मक संधी शोधत राहील.’

Nilesh Rane चं वादग्रस्त ट्विट… ‘पवार कुटुंब पूर्ण *** मेंदूचं’</a
>

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 4% वाढले
हिंडनबर्गच्या अहवालानंतर एकाच दिवसात अदानी इंटरप्रायजेसचे शेअर्स 35 टक्क्यांहून अधिक कोसळले होते. आजची परिस्थिती पाहिली तर अदानी एंटरप्रायजेसचे शेअर ४ टक्क्यांनी वाढले आहेत.

FPO घेतला होता माघारी
27 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रूपनं आपली फ्लॅगशीप कंपनी अदानी इंटरप्रायजेसचा 20 हजार कोटी रुपयांचा FPO पूर्णपणे सब्सक्राइब होऊनही परत घेण्याची घोषणा केली होती. अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांनी देशातील सर्वात मोठा एफपीओ परत घेत असल्याची माहिती दिली होती. शेअरमधील घसरण यामागचं कारण देण्यात आलं होतं.

श्रीमंतांच्या यादीत अदानी 24व्या स्थानावर
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 24व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार 14 फेब्रुवारी रोजी अदानीची एकूण संपत्ती 4.31 लाख कोटी रुपये ($52.2 अब्ज) इतकी घसरली. सोमवारी त्यांची एकूण संपत्ती 4.49 लाख कोटी रुपये ($54.4 अब्ज) होती. ते 23 व्या स्थानावर होते. 24 जानेवारीला हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube