Download App

खरेदीदारांसाठी सुगीचे दिवस; सोनं-चांदीच्या दरात घसरण कायम, वाचा आज काय आहेत भाव?

२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.

  • Written By: Last Updated:

Gold-Silver Price : अर्थसंकल्पाची ३ जुलैला घोषणा झाल्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू झाली. २२ जुलै रोजी सोनं ७३,००० तर चांदीची किंमत ८८ हजार ५०० रुपयांवर गेली होती. आज मात्र सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ६८ हजार ५०० तर चांदी प्रतिकिलो ८२ हजार ५०० रुपयांवर आली आहे. (Gold-Silver) सोनं अर्थसंकल्पानंतर साडेचार हजार तर, चांदी सहा हजारांनी स्वस्त झाली आहे. दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच किंमती घटल्या होत्या. अर्थसंकल्पाचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या भावावर दिसून येत आहे.

दर कमी का झाले ?  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच नवीन घरात; ५ सुनहरी बाग असणार नवा पत्ता

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सोनं, चांदीसह अन्य धातूंवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. सोने, चांदीवरील सीमा शुल्क आता ६ टक्के करण्यात आलं आहे. या घोषणेनंतर सोनं, चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. दोन्ही धातूच्या वाढत्या दरांना आता ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना सोनं, चांदी खरेदी करण्यासाठी सुगीचे दिवस आहेत.

खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी

अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा दर हा ७३ हजार रुपये प्रतिदहा ग्रॅम होता. शुक्रवारी (२६ जुलै) हा भाव ४ हजार ५०० रुपयांनी कमी होऊन तो आता ६८ हजार ५०० रुपये खाली आला. आजही सोन्याच्या दरात ३०० रुपये इतकी घट झाली आहे. चार दिवसात सोने स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी आहे.

तीन दिवसात भाव गडगडले नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?

तीन दिवसात चांदी ६,००० रुपयांनी स्वस्त झाली. २२ जुलैला चांदीचे प्रतिकिलो भाव हे ८८ हजार ५०० रुपये होते. आज चांदीचा भाव हा ८२ हजार ५०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे एकूणच चांदीच्या दरात सहा हजारांनी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी चांदीचे भाव पाच हजार रुपयांनी कमी झाले होते.

follow us