मुंबई : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ही लाट राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा राज्यातील वातावरण हे संमिश्रि प्रकारचे राहिले आहे. भरपूर पाऊस होऊन देखील यंदा राज्य कडाक्याची थंडी पडली नव्हती. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. परंतु अचानक वातावरणात बदल होऊन मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Ahmednagar Politics : कर्डिले पुन्हा ‘किंग’, मात्र ताकद विखेंची
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 4 मार्च ते 12 मार्च या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे वातावरण थंड राहू शकते या काळात तरी नागरिकांना उन्हाच्या झळा पासून सुटका मिळणार आहे. परंतु पुढच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
हिरकणी कक्षासाठी आवाज उठविणार… बाळासह आमदार मुदंडा अधिवेशनात
येत्या दोन महिन्यात राज्यातील तापमान वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी उष्णेतेची लाट येणार असल्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे.
या वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम शेतीसह मानवी आरोग्यावर देखील दिसून येऊ शकतो त्यामुळे सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमान वाढल्यानंतर दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर न जात घरातच थांबावे. थंड पदार्थाचे सेवन करावे, घरामध्ये देखील एसी, फॅन , कुलरचा वापर करावा.