Ahilyanagar Maratha Marriage Code of Conduct : पुणे येथील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणानंतर हुंडाबळी विरोधात मराठा समाज आक्रमक झाला. हुंडाबळी मुळे घडणाऱ्या या गोष्टी रोखण्यासाठी मराठा समाजाने आचारसंहिता (Maratha Marriage Code of Conduct) आखली. लग्न सोहळ्यामधील अनिष्ट प्रथा तसेच हुंडाबळी रोकता यावी, यासाठी आचारसंहिता लागू झाली पाहिजे. तसेच यामध्ये कोण कोणते नवीन नियम अन् अटी आहेत, याबाबत आपण (Ahilyanagar News)जाणून घेऊ.
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या अन् त्यानंतर समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. विवाह संस्थेमधील अनावश्यक हुंडाबळीला कुठेतरी अटकाव घालण्यासाठी गरजेच्या असल्याचं अहिल्यानगरमधील मराठा समाजाला वाटले. त्यानंतर मराठा समाजाने एक बैठक घेत एक आचारसंहिता लागू केली. याबाबत नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे एक बैठक घेण्यात आली. यामध्ये काही नियम अन् अटी तयार करण्यात आल्या.
लग्नाच्या आचारसंहितेच्या नियम अन् अटी
– लग्न सोहळा 300 ते 500 लोकांमध्ये करा
– साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करा
– प्री-वेडिंग करू नये तसेच लग्न वेळेत लावा
– नवरा नवरीला हार घालताना उचलण्याचे प्रकार बंद करा
– लग्नात हुंडा देऊ नये तसेच कर्ज काढून लग्नाचा खर्च नको
– डीजेला फाटा देत पारंपारिक वाद्याचा वापर करावा
– वरती पुढे दारू पिऊन धिंगाणा घालणे बंद करा
– लग्नात वधू वर पित्यानेच फेटा बांधावा
– लग्नात मोठ्या लोकांच्या हस्ते महागड्या वस्तू देण्याचा देखावा नको
– रोख आहेर करावा, अन्नाची नासाडी नको
– घर संसार देण्यापेक्षा मुलीचे नावे एफडी करा
– सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करावा
– सासरच्या व्यक्तीने हुंडे साठी पैशासाठी मुलीचा छळ करू नये
या बैठकीला यावेळी ह. भ. प. भास्करगिरी महाराज हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सर्व जाते धर्मातील लोकांना आज संदेश देतो की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधान न करता आजच सुख हे आपल्याला उद्या रडवायला लावणार नाही,. याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले. तसेच यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने विवाह सोहळा करता येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच मुलीसाठी जे काही आपल्या अशा अपेक्षा असतील, त्यासाठी जो खर्च करायचा त्या ऐवजी आपण तिच्या नावे एफडी करावी, अशी भूमिका पालकांची देखील असावी.