Ahilyanagar SP Gharge transferred : चोर, दरोडे, खून अशा घटनांना आळा घालत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहचविणारे अशा धडाखेबाज कारवाया पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केल्या. राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला अशोक खरात प्रकरण बाहेर काढण्यात देखील महत्वाचा वाटा हा घार्गे यांचाव त्यांच्याच विशेष पथकाचा होता. यामुळे अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली अवघ्या वर्षभरात का झाली ? नेमकं त्यांच्या या आक्रमक कारवाया कोणाच्या डोळ्यात खुपल्या याचीच जोरदार चर्चा आता नगर जिल्ह्यात रंगली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांनी 23 मे 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र यांची अवघ्या वर्षभरातच बदली झाल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
बदलीचे नेमकं कारणे काय? जाणून घेऊ
घार्गे यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे राजकीय दबावला न बळी पडता स्थानिक गुन्हे शाखेतील नियुक्त्यांमध्येही त्यांनी स्वायत्तता राखली होती. मात्र, त्याच गुन्हे शाखेतील एका कर्मचार्याने ड्रग्स प्रकरणात केलेला घोटाळा राज्यासह अधिवेशनात गाजला. यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन झाली.
कालच सरकारकडून थाटात उद्घाटन! पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन बंद का?
याशिवाय, जिल्ह्यातील संगमनेर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यातील आरोपीला अटक करण्यात आलेला अपयश यामुळे पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आर्थिक घोटाळ्यांच्या प्रकरणांत तपासामधील हलगर्जीपणावरूनही प्रशासनावर टीका झाली. या सर्व घडामोडींमुळेच घार्गे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली हि दोन कारणामुळे होते यामध्ये एक तर मुदत संपली तेव्हा किंवा प्रशासकीय कारणावरून होते. म्हणजे कामाबद्दल सातत्याने तक्रारी येणे , राजकीय आरोप झाले, पालकमंत्री किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांच्याशी वाद होणे , कुठल्या प्रकरणात अडकले, जिल्ह्यात मोठी काही घटना घडली अशी कारण कारणीभूत असतात पण अहिल्यानगरच्या बाबतीत असेही काही झाल्याचे दिसत नाही.
आक्रमक कारवाया डोळ्यात खुपल्या
जिल्हाच्या पदभार स्वीकारताच घार्गे यांनी आक्रमक कारवाया सुरु केल्या. अनेक आरोपींना जेरबंदकेले. अनेक कत्तलखाने बंद पाडले, तसेच अवघ्या सहा महिन्यांत एमपीडीए कायद्यांतर्गत अनेक आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले . या धडक कारवाईमुळे काही विशिष्ट घटकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील काही व्यक्तींकडून पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनौपचारिक चर्चांमधून समोर येत होती. अखेर सोमनाथ घार्गे यांची बदली झाली. मात्र अनेकजण त्यांची बदली स्थगित करण्यात यावी अशी मागणी करत आहे.
