Ahilyanagar Water Supply Closed 7th December : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar News) पाणीपुरवठ्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले आहे. शहरात महावितरण कंपनीकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त मुळा धरण परिसरातील विद्युत वाहिनीचा विद्युत पुरवठा शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात आला (Water Supply) आहे. याच कालावधीत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीकामे होणार आहेत. त्यामुळे नगर शहरातील विविध भागांत एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार आहे.
आमदार संग्राम जगतापांना मंत्री करा; भिंगारकरांचा शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक
‘या’ भागाला पाणी पुरवठा होणार नाही
शनिवारी 7 डिसेंबर रोजी मुळानगर विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी 7 डिसेंबर रोजी बोल्हेगाव, (Ahilyanagar Water Supply) नागापूर, सावेडी, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागांत सकाळी ११ नंतरच्या पाणी वाटपाच्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्याऐवजी रविवारी 8 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा होईल.
..ही निवडणूक आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वांत… इम्तियाज जलील पराभवानंतर नक्की काय म्हणाले?
‘या’ भागांना पाणी पुरवठा होणार नाही
रविवारी 8 डिसेंबर रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडी गेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, म्युन्सिपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागांना पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी सोमवारी 9 डिसेंबर रोजी पाणी पुरवठा होईल.
सोमवारी 9 डिसेंबर रोजी पाणी पुरवठा होणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजे सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापड बाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय, माळीवाडा, बालिकाश्रम परिसर व सावेडी या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी मंगळवारी 10 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.