जिल्हाधिकाऱ्यांना दिले मैलामिश्रित पाणी; शेवगावकरांची पाण्यासाठी हाल !
dirty water given to Collectors, Shevgaonkar’s problem for water! अहमदनगर: जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दक्षिणेतील अनेक तालुक्यांतील गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा (Tankar water supply) सुरू आहेत. आजघडीला जिल्ह्यात साडेतीनशेच्या आसपास टँकर सुरू आहेत. काही ठिकाणी पाणी असले तरी शुद्ध पाणीही मिळत नाही. शेवगाव शहराला (Shegaon) मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. वाढीव पाणीपुरवठ्याचे काम तात्काळ सुरू करावे, नियमित पाणीपुरवठा करून रस्ते, सांडपाणी व विद्युतीकरण त्वरित करावे. सध्या शेवगाव शहरातील नागरिक दुर्गंधीयुक्त मैलामिश्रित गढूळ पाणी पीत आहेत, असे निवेदन व दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी बॉटल सह यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांना माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिले.
Pune Car Accident : सुरेंद्र अग्रवालांसाठी जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने दिली पोलीस कोठडी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शेवगाव शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेचे नियोजन 2017 ला मंजुरी मिळाली. त्यानुसार त्याचे टेंडर होऊन 7 जून 2023 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला.
पुण्यातील ‘बाळाचा’ 17 व्या वर्षीच कारनामा… पण ‘दारु पिण्याचं नेमकं वय किती?’
या आदेशानुसार हे काम 6 डिसेंबर 2024 पूर्वीच पूर्ण होणे आवश्यक आहे. आज कार्यारंभ आदेश देऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलेली आहेत. तरीही या योजनेचे काम सुरू झालेले नाही. यात काहीतरी गौड बंगाल असल्याची शक्यता. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व पावसाचे कारण दाखवून काम सुरू करण्यास टाळाटाळ होऊ शकते, असे काकडे यांनी म्हटले आहे. एकीकडे शहरातील 45 हजार नागरिक प्रचंड मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहेत.
काही भागात तर 12 ते 15 दिवसाला पाणी मिळते. मिळणारे पाणी हे गढूळ, गाळ, मैला मिश्रित येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून वाढीव 87 कोटी 20 लाख 40 हजार रकमेची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे. या मागणीसाठी शेवगाव नगरपालिका कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ शहरातील नागरिक करणार आहेत. यासाठी शेवगाव शहर नागरिक कृती समिती ठिकठिकाणी बैठका घेत जनतेची जनजागृती करत असल्याचे काकडे यांनी यावेळी सांगितले.