Download App

धक्कादायक! मित्रच बनला वैरी… डोक्यात गोळी घालून केली हत्या

Ahmednagar Murder News : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मैत्रीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हॉटेलमध्ये लागणारा सामान खरेदी करण्याचा

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Murder News : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मैत्रीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हॉटेलमध्ये लागणारा सामान खरेदी करण्याचा कारण सांगत मित्राला कारमध्ये बसून अहमदनगरला (Ahmednagar) आणले आणि रस्त्यातच कार थांबूनच्या डोक्यात थेट गोळी झाडून त्याची हत्या केली. एवढ्यावरच ना थांबता पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नगर जवळून तो मृतदेह थेट सांगली जवळ नेऊन टाकला. अखेर हा गुन्हा उघडकीस आला असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब रामदास पवार (राहणार नेवासा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गोरख अशोक माळी आणि रवींद्र किसन माळी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश पवार व आरोपी माळी हे एकाच गावातील रहिवासी असून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते आरोपी गोरख माळी याचे हॉटेल असून त्या हॉटेलचे सामान खरेदी करण्यासाठी हे तिघेही जण नगरच्या दिशेने रवाना झाले होते. नगरच्या जवळपास शेंडी परिसरात गाडी आली असता गोरख माळी याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. कोणीही नसल्याचा अंदाज घेत त्याने गावठी कट्टा कडून पवार यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी पवार यांचा मृतदेह गाडी टाकून थेट सांगलीतील नदीकाठी नेऊन टाकला.

भाऊसाहेब पवार यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात आल्या असता त्यांनी पवार यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मयताचे नातेवाईक अण्णा वसंत पवार यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता मयत पवार हा गोरख माळी व रवींद्र माळी यांच्याबरोबर अहमदनगरकडे आला अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानंतरच पवार हे बेपत्ता झाल्याचे देखील समोर आले.

Rajat Sharma प्रकरणात काँग्रेस नेत्यांना धक्का, ‘तो’ व्हिडिओ डिलीट करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

पोलिसांनी शोध घेत आरोपी रवींद्र माळी याला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हे हत्याकांड कसे घडले हे पोलिसांना सांगितले. मुख्य आरोपी गोरख अशोक माळी फरार आहे. हे हत्याकांडातील एक आरोपी पकडण्यात आला असला तरी मात्र ही हत्याकांड का घडले याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याचे समजते आहे.

follow us