Download App

Ahmednagar News : अहमदनगर पोस्ट ऑफिसच्या अधीक्षकपदी श्री बी नंदा

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : श्री बी नंदा (Shri B Nanda) यांची अहमदनगर विभागाच्या प्रवर अधिक्षक डाकघर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा यांनी श्रीरामपूरचे डाकघर अधिक्षक हेमंत खडकेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Ahmednagar News) सुरेश बन्सोडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर आता या पदावर नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आनंद शिंदेंनी गाण्यातून कशी वाहिली मानवंदना? LetsUpp Marathi

श्री बी नंदा हे अधिक्षक रेल्वे मेल झेड डिव्हिजन हैद्राबाद येथे कार्यरत होते. त्यांची 2010 मध्ये उपविभागीय डाक निरीक्षक या प्रशासकीय अधिकारी पदावर निवड झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये पी. एस. एस. ग्रुप बी मध्ये त्यांचे प्रमोशन झाले. नंदा यांनी काहीकाळ महाराष्ट्रात एडीपीएस नागपूर रिजन येथेही काम पाहिले आहे. याशिवाय नंदा यांनी तेलंगणा पोस्टल सर्कलमध्ये हैद्राबाद, नलगौडा,करीमनगर,मैदक, संगारेड्डी, हुजराबाद, मैदापल्ली याठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

विखे- पाटलांच्या पक्षांतरावर राऊतांचा घणाघात; म्हणाले, आधी शिवसेनेत, नंतर काँग्रेसमध्ये अन् आता…

पदाभार स्वीकारताना बदल नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष व अहमदनगर विभागाचे नेते संतोष यादव, नामदेव डेंगळे, संजय बोदर्डे, कमलेश मिरगणे, अशोक बंडगर, तान्हाजी सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, सागर कलगुंडे, सागर पंचारिया, संतोष घुले, अरुण रोकडे, सुनिल थोरात यांच्यासह संघटनेचे सभासद उपस्थित होते.

follow us