विखे- पाटलांच्या पक्षांतरावर राऊतांचा घणाघात; म्हणाले, आधी शिवसेनेत, नंतर काँग्रेसमध्ये अन् आता…
Sanjay Raut On Radhakrishna Vikhe Patil: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या (BJP) राधाकृष्ण पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे (Congress) अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला होता. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी विखे- पाटलांच्या पक्षांतरावर घणाघात केला.
म्हणाले की, राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष आतापर्यंत बदलले आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेललं आहे. मग शिवसेनेमध्ये त्यांच्यावर आम्ही काय बोलणार? कोण जातं आणि राहतं? हे येणारा काळ ठरवेल. भाजपकडे सत्ता नसेल, तेव्हा आपण कुठे असणार आहात? याचा विचार केला पाहिजे, असा खोचक टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात फक्त पेट्रोल, डिझेलच्या संपावरचं गोंधळ नाही, तर मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत, पोलिसांवर हल्ले झाले आहेत. याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. केंद्रातील नेत्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. हिट अँड रन अतिशय गंभीर कायदा आहे. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अभूतपूर्व आहे. हे प्रकरण चिघळत गेलं, तर सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागेल, यावेळी संजय राऊत म्हणाले.
ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम; पेट्रोलचा टॅंकर येणार नसल्याच्या भीतीने पंपावर तोबा गर्दी
काँग्रेसचे वरिष्ठ आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते, दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. जवळजवळ जागा वाटपाचा विषय आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठली अडचण दिसत नाही. भविष्यात गरज पडल्यास दिल्लीत जाऊन आणि काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू. प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे सर्व साधने आहेत, त्यांनी दक्षिण ध्रुवावरून जरी प्रचार केला तिथे त्यांना कोण अडवणार आहेत? ते काहीही करू शकतात, असे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.