Zilla Parishad Election  : अजितदादांच्या आमदाराची एकच पोस्ट, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये भडका उडणार?

Zilla Parishad and Panchayat Samiti Election  : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या

  • Written By: Published:
Zilla Parishad And Panchayat Samiti Election

Zilla Parishad and Panchayat Samiti Election  : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. ज्या ठिकाणी तुतारी या चिन्हाचा फायदा होणार त्या ठिकाणी तुतारी आणि ज्या ठिकाणी घड्याळ या चिन्हाचा फायदा होणार त्याठिकाणी घड्याळ चिन्ह वापरण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीसाठी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र असल्याची घोषणा करत असताना स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्र नसल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके (Dnyaneshwar Katke) यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकृत उमेवारांना विजय करण्याचे आवाहन केले आहे मात्र या पोस्टमध्ये त्यांनी मांडवगण वडगाव रासाई च्या उमेदवार सुजाता पवार यांना वगळून सर्व उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहान केले आहे.

त्यामुळे हवेली मतदारसंघात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या या पोस्टवर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक उपाध्यक्ष अनिल जगताप पाटील यांनी संताप व्यक्त करत आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, आज जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना जर अशा प्रकारे दुजाभाव करून सुजाता पवार यांना डावलले जात असेल तर शिरूर हवेलीतील सर्व आदरणीय बापूना मानणाऱ्या जनतेस विनंती आहे की, जर यांना इतकेच बापू आणि सुजाता पवार चे वावडे असेल तर युती करण्याची नाटके का केली? आणि जर असेच वागणार असेल तर बापू प्रेमींना विनंती आहे.

अनावश्यक खर्च अन् अडचणी वाढणार, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी कसा राहणार आजचा दिवस ?

आम्ही वेळीच यांची चाल ओळखून वेगळी वाट निवडली तशी जर अजित पवार यांच्या गटाने चूक सुधारून सुजाता पवार यांना सन्मान दिला नाही तर नाराजीचे संतापात रूपांतर झाल्या शिवाय राहणार नाही .., सर्व माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या मानणाऱ्या लोकांना विनंती आहे विचार करा ??????? असं पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक उपाध्यक्ष अनिल जगताप पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.

follow us