Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्हा बँक आता मोबाईल अॅपवर, शेतकऱ्यांना मिळणार नवनवीन सुविधा

  • Written By: Published:
Radhakrishna Vikhe Patil :  अहमदनगर जिल्हा बँक आता मोबाईल अॅपवर, शेतकऱ्यांना मिळणार नवनवीन सुविधा

Radhakrishna Vikhe Patil : आशिया खंडात पहिली जिल्हा बँक म्हणजे अहमदनगर जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग अॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना बँकेच्या नवनवीन सुविधा मिळणार आहे. तसेच हि बँक स्पर्धेच्या युगात पुढचे पाऊल टाकत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.(Ahmednagar District Bank now on mobile app, farmers will get new facilities)

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोबाईल अॅप उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.डॉ.सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब मस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, बँकेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी रावसाहेब वर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की आशिया खंडात आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली असून राज्यात बँकेचा नावलौकिकही आहे. बँकेने शेतकरी, कारखानदार तसेच महिला बचतगटांना गरजेच्या वेळी कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. ही बँक यावरच थांबली नसून इतर बँकेच्या स्पर्धेत स्वतः चे अस्तित्व टिकवत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://letsupp.com/maharashtra/physical-abuse-in-mumbai-local-chitra-wagh-on-supriya-sule-57819.html

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बँकेच्या ठेवी ह्या आठ हजार 555 कोटीच्या असल्याचे सांगून 11 हजार 861 कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. 287 शाखा तर 11 विस्तार कक्षाद्वारे बँक सेवा देत असुन बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मोबाईल बँकिंग अॅप सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात महिला बचतगटांना कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले.कार्यक्रमास बँकेचे संचालक, शेतकरी सभासद, पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube