Download App

Ahmednagar : नागरिकांनाे सावधान! पुढील पाच दिवस असणार अवकाळी संकट

  • Written By: Last Updated:

अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जाेरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यातच आता पुन्हा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज (ता. २८) ते २ मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस हाेणार असल्याचे हवामान खात्याने भाकित वर्तवले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन हवामान खात्याच्यामार्फत करण्यात आले आहे.

Cm Eknath Shinde : पोलिसांकडून लाठीचार्ज झाला नाही, राजकारणासाठी राजकारण करु नका…

तसेच यावेळी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

‘मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं’… अजित पवारांपाठोपाठ आठवलेंनी व्यक्त केली इच्छा

याचबरोबर विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Tags

follow us