Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही निवडणुकीच्या आधी प्रंचड गाजली होती. ही योजना निवडणुकीपुरती मर्यादित आहे, नंतर बंद केली जाईल, अशी टीका विरोधकांकडून होत होती. मात्र, ही योजना सुरूच राहणार असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र अद्याप जानेवारीचा हप्ता लाभार्थीं महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं.
२६ जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आता लाडक्या बहीणींचे पैसे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.
महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की, जर राज्यात आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर लाडक्या बहिणींना १५०० रुपये नाही तर २१०० रुपये देऊ. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीचं सरकार येण्यात लाडक्या बहीणींची मोठी भूमिका आहे, असं महायुतीनेही मान्य केलं. त्यामुळं आता संपूर्ण राज्य २१०० रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. आता अर्थमंत्री अजित पवारांनी या योजनेच्या हप्त्याबाबत म्हणाल की, माझी लाडकी बहिण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त गरजू महिलांनाच त्याचा लाभ मिळायला पाहिजे. जे श्रीमंत आहेत, कर भरतात, नोकऱ्या आहे, त्यांच्याबद्दल मी वेगळा विचार करेन. परंतु ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महिला आणि बालविकास विभागाने केलं.
VIDEO : MahaKumbh 2025: कुंभमेळाव्यात अग्नितांडव, तासभरात आग आटोक्यात
या योजनेसाठी परवाच ३७०० कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. या योजनेचा सातवा हप्ता २६ तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी सादर होणारा अर्थसंकल्प आर्थिक शिस्त लावणार असेल, असंही ते म्हणाले.
बंडखोरांना राष्ट्रवादीत नो एंट्री…
ते म्हणाले की, विधानसभेच्या यशानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. पक्षात येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ज्यांची जनमानसात प्रतिमा मलिन आहे, त्यांना राष्ट्रवादीत नो एंट्री असणार. तसंच ज्यांनी बंड केलं होतं, ते चुकलं-चुकल म्हणून माझ्याकडे येत आहेत. मात्र कुणालाही पक्षात घेणार नाही. त्यांना देखील शिस्त म्हणजे काय हे कळायला हव. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे, असं अजित पवार म्हणाले.