महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Vinayak Raut On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) विरोधकांकडून सातत्याने महायुती (Mahayuti) सरकारवर टीका केली जातेय. लाडकी बहीण योजना बंद होणार असं विरोधक सांगत होते. तर योजना बंद होणार नाही, असं महायुतीकडून सांगण्यात आलं. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्याने लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लाडकी बहीण योजना आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर बंद होईल, असं राऊतांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधान आलं आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता…
विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार कंबर कसली आहे. अशातच विनायक राऊतांनी हे विधानं केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात आताच काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. तसेच इतर बाकीच्या ज्या सोई सुविधा मिळत असतात, त्यावरही परिणाम होत आहे. लाखो-करोडो रुपयांच्या कर्जांत महाराष्ट्र डुबला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान अर्थमंत्री अजित पवार कसं पेलतील याबाबत प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.
मोठी बातमी! जालन्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना अटक, एटीएसची कारवाई…
पुढं बोलतांना राऊत म्हणाले की, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवतील, मात्र नंतर ही लाडकी बहीण योजना महायुती सरकार कायमस्वरुपी बंद करेल, असं राऊत म्हणाले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त…
संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी मला खात्री आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांत ज्या प्रकारे खून, लैंगिक अत्याचार, खून, दरोडे या घटना घडत आहेत, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही, गु्न्हेगार मोकाट फिरत आहेत, अशी टीका राऊतांनी केली.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं. आता निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देण्यात येतात, याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे.