Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत तिथेच आहेत. हे अस कसे चालेल? असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटलांवर टीका केली. अजित पवार गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते.
भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला…
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘प्रकाश सोळंके हे समोर बसलेले आहेत. मी खोटं बोलणार नाही. पण जेव्हा मी फडणवीसांसोबत शपथविधी केला. तेव्हा सोळंके यांना मंत्रिपदं हवं होतं. म्हणून ते नाराज झाले होते. तेव्हा प्रकाश सोळंके यांनी पक्षाचा राजीनामा देऊ केला होता. त्यावेळी मी आणि जयंत पाटील यांनी त्यांना थांबवलं.’
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
‘तसेच असं ठरलं, जयंत पाटील यांनी सांगितल एक वर्ष मी अध्यक्ष राहतो. त्यानंतर सोळंके यांनी अध्यक्ष व्हावं हे नक्की झालं. मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत तिथेच आहेत. हे अस कसे चालेल?’ असं म्हणत अजित पवार यांनी देखील जयंत पाटलांबाबत माहिती समोर आणत त्यांच्यावर टीका केली. त्यांना टोला लगावला.’
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
पुढे अजित पवार म्हणाले की, जयंत पाटलांनी मात्र जलसंपदा खात असताना देखील प्रदेशाध्यक्ष पद सोडलं नाही. ते म्हणाले वरिष्ठ म्हणतात थांबा. पण त्यांनी वरिष्ठांना सांगितलं नाही. की, माझ्याकडे जलसंपदा खात असल्याने मला पक्षाच्या प्रदेशाध्यपदावर नीट लक्ष देता नाही. पण नाही. त्यांना पद सोडलं नाही. सोळंकेंना नाराज केलं. पण मला हे आवडत नाही. असं अजित पवार म्हणाले.
Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा
दरम्यान अजित पवार यांच्या अगोदर छगन भुजबळ यांनी देखील जयंत पाटलांना टोला लगावला. ते म्हणाले की, जयंत पाटील हे देखील अजित पवार गटामध्ये येणार होते. ‘ तुमचं सुद्धा तेच चाललं होतं ना. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं आहे की. 2004 मध्येच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती. यातील अनेक गोष्टी तर मलाही माहिती नाही.’
‘ पण मला जेव्हा हे कळालं मग म्हटलं तळ्यत-मळ्यात कशाला? काय तो एकदाचा निर्णय घ्या. सगळ्यांनी 54 आमदारांनी सर्व खासदारांनी सुद्धा सह्या केल्या. त्यात जयंत पाटीलही होते. कुठून कुठे जायचं होतं. त्यासाठी विमानही तयार होतं. मात्र ऐनवेळी जयंतरांवांना वाटलं साहेबांना एकदा विचारांवं पण ते गेले आणि साहेब नाही म्हटल्याने ते आलेच नाही. त्यामुळे जयंत पाटील अजित पवार गटामध्ये येता येता राहिले. ‘ असं सांगत यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तर त्यांनी जयंत पाटलांच्या अजित पवार गटात न येण्याचा किस्सा सांगितला तेव्हा व्यासपीठावर हशा पिकला होता.
