Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा

Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News ) अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. यातच पारनेर तालुक्यात मोठी गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेकांचे संसार देखील पावसामुळे वाहून गेले आहेत. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. पारनेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभी पिके जमीनदोस्त तर झाली मात्र अनेकांचे संसार देखील पाण्याखाली गेले.

पवारांच्या धरसोडीच्या राजकारणावर भुजबळांचा थेट हल्ला; अजितदादांना षडयंत्र उघड करण्याची विनंती

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच यावेळी शेतात जात झालेल्या नुकसानीचे पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा देखील प्रत्यन केला. मात्र यावेळी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगता सांगता त्यांच्या अश्रूचा अक्षरशः बांधा फुटला.

Chhagan Bhujbal : जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण

यावेळी एक महिला म्हणाली, साहेब आम्ही शेतात होतो आमचे नेहमीचे काम सुरु होते. अन अचानक जोराचा पाऊस सुरु झाला. यावेळी गारा देखील मोठं मोठ्या पडू लागल्या. या गारा बघून आम्ही थोडा वेळ जवळच आसऱ्याला उभा राहिलो. पाऊसाचा ओघ कमी झाला अन घराकडे निघालो. घरी जाऊन पाहतो तर आमचा संसार तोपर्यंत पाण्याखाली गेला. अन असं म्हणत म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

तसेच शेतकरी देखील पिकांच्या नुकसानीची माहिती देताना बोलले कि आधीच दुष्काळाने आम्ही व्यथित होतो. सगळं काही व्यस्थित होईल या आशेने आम्ही पुन्हा पेरणी केली पीक देखील आली अन काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. डोळ्यादेखत उभी पिके पावसाने जमिनीत झोपवली. कर्ज काढून पीक घेतली मात्र पिकाचे पैसे हातात येण्यापूर्वीच ते हिरावून घेतले आता आम्ही जगायचं कसं तुम्हीच सांगा अशा शब्दात यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर मांडली.

मंत्री विखेंचे तातडीने पंचनाम्याचे आदेश

पारनेर तालुक्यात मोठा पाऊस झाला असून शंभर टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणाऱ्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांवर संकट आली त्यावेळीच देखील सरकार त्यांच्यापाठीशी खंबीर उभे राहिले आहे. या संकटात देखील शेतकऱ्यांना जो काही आर्थिक फटका बसला आहे त्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी मंत्री विखे यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube