जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; भुजबळांनी अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण

जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; भुजबळांनी अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले सर्वजन अजित पवारांसोबत येत आहेत. त्यामुळे जय जयंत पाटील यांची चिडचिड होत आहे. तसेच देखील आमच्यासोबत अजित पवार गटामध्ये येणार होते पण ते येता येता राहिले. त्यांना पवारांनीच रोखले. असंही भुजबळ म्हणाले.

जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं…

अजित पवार गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या भाजपसोबत जाण्याच्या घटनेचा किस्सा सांगितला. यामध्ये त्यांनी जयंत पाटील हे देखील अजित पवार गटामध्ये येणार होते. ‘ तुमचं सुद्धा तेच चाललं होतं ना. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं आहे की. 2004 मध्येच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती. यातील अनेक गोष्टी तर मलाही माहिती नाही.’

पवारांच्या धरसोडीच्या राजकारणावर भुजबळांचा थेट हल्ला; अजितदादांना षडयंत्र उघड करण्याची विनंती

‘ पण मला जेव्हा हे कळालं मग म्हटलं तळ्यत-मळ्यात कशाला? काय तो एकदाचा निर्णय घ्या. सगळ्यांनी 54 आमदारांनी सर्व खासदारांनी सुद्धा सह्या केल्या. त्यात जयंत पाटीलही होते. कुठून कुठे जायचं होतं. त्यासाठी विमानही तयार होतं. मात्र ऐनवेळी जयंतरांवांना वाटलं साहेबांना एकदा विचारांवं पण ते गेले आणि साहेब नाही म्हटल्याने ते आलेच नाही. त्यामुळे जयंत पाटील अजित पवार गटामध्ये येता येता राहिले. ‘ असं सांगत यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तर त्यांनी जयंत पाटलांच्या अजित पवार गटात न येण्याचा किस्सा सांगितला तेव्हा व्यासपीठावर हशा पिकला होता.

Animal Leak: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!

तसेच ते म्हणाले की, सर्वजन अजित पवारांसोबत येत आहेत. त्यामुळे जय जयंत पाटील यांची चिडचिड होत आहे. तसेच देखील आमच्यासोबत अजित पवार गटामध्ये येणार होते पण ते येता येता राहिले. त्यांना पवारांनीच रोखले. असं सांगत भुजबळांनी अजित पवारांसमोरच जयंत पाटलांच्या चिडचिडीचं कारण सांगितलं. त्यांना टोला लगावला.

Sanjay Raut : ‘काँग्रेसचा विजय म्हणजे ‘इंडिया’चा विजय, 2024 नंतर उलटे चक्र फिरेल’; राऊतांनी भाजपला डिवचलं

दरम्यान पुढे बोलताना भुजबळ यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षणाला आमचा आजिबात विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण जाहीर करावे. आमचे आम्हाला द्या, आमच्या ताटात वाटेकरी होऊ नका, दबलेल्या पिचलेल्या लोकांना वर आणण्याची आमची भूमिका आहे. आमची परीक्षा पाहू नका. आम्ही सुद्धा लढू शकतो. यासाठी ओबीसींची जातगणना करा. मग आमची ताकद काय आहे ते कळेल. अशी मागणी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube