मराठा आरक्षणाला विरोध केला तर तू जास्त दिवस…; मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

  • Written By: Published:
मराठा आरक्षणाला विरोध केला तर तू जास्त दिवस…; मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

नाशिक : गेल्या काही दिवसांत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना-मंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) मिळाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली. या धमकीमुळं राज्याच्या राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.

440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’ 

गेल्या महिनाभरापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्या, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तर मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देऊ नका, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. त्यामुळं जरांगे आणि भुजबळ यांच्यात चांगल्याच शाब्दीक चकमकी झाल्या होत्या. अशातच भुजबळांनी जीवे मारण्याची धमकी आली. अजित पवार गटाचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दाखल केली आहे.

छगन भुजबळ हे येवल्याचा दौऱ्यावर निघाले असतांना दोन सहाय्यकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्यात आला होता. प्रत्येक वेळी भुजबळ साहेबांशी बोलायचे आहे, असं सांगितलं जातं होतं. त्याचबरोबर भुजबळ यांच्याही मोबाईलवर संपर्क केला. अखेर 9075015875 या मोबाईल क्रमांकावरून भुजबळांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात आला. तू जास्त दिवस राहणार नाही, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याचं खैरे यांनी तक्रारीत नमुद केलं.

भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. खैरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेस केला. हा नबंर रभणी भागातील असल्याचं आढळून आलं. त्यानुसार संशयिताला अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात छगन भुजबळांना दिलेली ही पाचवी धमकी आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये भुजबळांना तीन पानी धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. जुलै 2023 मध्येही भुजबळ पुण्यात असताना त्यांना कोल्हापुरातील तरुणाने धमकी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube