Download App

माळेगावच्या निवडणुकीत ज्या लोकांनी अजित पवार गटाला मतदान केलं त्यांना…, खासदार सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Supriya Sule On Malegaon Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election)

  • Written By: Last Updated:

Supriya Sule On Malegaon Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election) अजित पवार (Ajit Pawar) गट बाजी मारताना दिसत आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल, शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल , चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शेतकरी बचाव समितीचे एक पॅनल अशा चार पॅनलमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून अजित पवार गट आतापर्यंत पुढे आहे. तर आता या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला शुभेच्छा देत आम्ही सहकार चळवळीच्या निवडणुकीत जास्त लक्ष घालत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ज्या लोकांनी अजित पवार गटाला मतदान केले आहे त्यांना शुभेच्छा, आम्ही सहकार चळवळीच्या निवडणुकीत जास्त लक्ष घालत नाही. जे पॅनल निवडून येतो त्या पॅनलला आम्ही मदत करतो संपूर्ण महाराष्ट्रात असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्यात सध्या सुरु असणाऱ्या हिंदी (Hindi Language) सक्ती प्रकरणात देखील प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिक्षण हे अतिशय गंभीर विषय आहे. नवीन शिक्षण पॉलिसी सोपी असावी. मी स्वतः एसएससीमध्ये शिकले आहे. एसएससीमध्ये पहिली ते चौथी दोन भाषा आहे. त्यामध्ये बदल करण्याचा कारण काय? बदल करण्यासाठी काही डेटा पुरावे पाहिजे. फक्त मनमर्जी प्रमाणे बदल करता येत नाही असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

… तर सत्य बाहेर येईल, ‘त्या’ प्रकरणात सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात.

follow us