Download App

आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात अन्…, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला

Ajit Pawar  :  सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी

Ajit Pawar  :  सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) यासाठी जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आदेश देण्यात येत आहे. तर दुसरीकडे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मिश्किल टोला लावला आहे.  अजित पवार यांनी आज पुण्यातील बिबवेवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान व यशवंत क्लासेसच्या वतीनं आयोजित “मातृ नाम प्रथम – शपथ ग्रहण 2025” या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना मिश्किल टोला लावला.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, संकर्षण म्हणाला की दादा मी एक नवीन नाटक काढल आहे त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या मी त्याला म्हटलं की आता रोज आम्ही नाटक करत असतो मला काय नाटक दाखवणार? आम्हालाही वाटतं नाटकाला जावं पण कामातून वेळ भेटत नाही.  आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात हे करा ते करा अरे सारखं काय करा तुझं कर्तुत्व असेल तर मी करेन सारखं पुढ करतात काम मात्र करत नाहीत.  जाऊ दे आता जास्त नाही बोलणार निवडणूक आहेत असा मिश्किल टोला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना लावला.

तर या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना सभागृहात महिला आरक्षण बिल कसा पास झाला याबाबतचा किस्सा देखील सांगितला. यावेळी अजित पवार म्हणाले की, महिलाना राजकारणात 33 टक्के आरक्षण आपण दिलं आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव , नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे म्हणून राजकारणात हे आरक्षण आणले आहे. शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं होतं.

बीसीसीआयनेच केलं विराटला आऊट?; कसोटी निवृत्तीनंतरच्या अहवालाने खळबळ 

पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू राहील मला आठवत आहे की सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतला. साहेबांनी ठणकावून सांगितलं की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झाले असं अजित पवार म्हणाले.

follow us