Download App

शरद पवारांचा शिलेदार फोडण्याची तयारी? अजितदादा-प्राजक्त तनपुरेंच्या निवासस्थानी, चर्चांना उधाण

Ajit Pawar Meet Prajakt Tanpure : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज जिल्ह्यातील राहुरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. दोघांमध्ये काही चर्चा देखील झाल्याचे माहिती (Ahilyanagar Politics) समजते आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या गटात असलेले तनपुरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाणार (Rahuri) की काय? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.

अजित दादा -प्राजक्त तनपुरेंच्या निवासस्थानी

राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांचा एक गट अन् शरद पवार यांचा एक गट तयार झाला. अनेकांनी अजित दादांची साथ देत त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही जणांनी शरद पवार यांच्याशी आपली निष्ठा असल्याचं सांगत, पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने विचार केला, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील होते.

जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर… एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘अडकवलं जातंय…’

जयंत पाटील यांचे भाचे असलेले माजी मंत्री प्राजक्त तानपुरे यांनी देखील मामांच्या निर्णयाला सहमत दर्शवित शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त यांनी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवली. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचा पराभव केला.

मोठी बातमी ! राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची गळाभेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामा-भाचे नेमका निर्णय घेणार?

पराभवानंतर देखील प्राजक्ता हे राजकारणात तसेच मतदार संघात सक्रिय राहिले. ते भाजपमध्ये जाणे, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगल्या होत्या. यावर सगळे पत्ते आत्ताच उघडायचे नसतात, असे म्हणत प्राजक्त यांनी सुचक विधान केलं होतं. त्यानंतर प्राजक्त यांचे मामा जयंत पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मामा-भाचे नेमका काय निर्णय घेणार? याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

नवं समीकरण जुळणार का?

अजित पवार हे आज राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी तनपुरे कारखान्याचे नूतन अध्यक्ष अरुण तनपुरे यांची मोठी प्रशंसा केली. तसेच कार्यक्रमानंतर ते प्राजक्त यांच्या निवासस्थानी गेले. नमस्कार प्राजक्तजी म्हणत त्यांनी घरामध्ये प्रवेश केला. यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरद पवार यांचा शिलेदार अजित दादांच्या गळाला लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

follow us