Ajit Pawar meeting with Amit Shah : एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी आजच्या बैठकाही रद्द केल्याचे समजते. गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत. (Ajit Pawar) दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्तास्थापनेच्या आधी मंत्रिपदे मिळवण्यासाठी हालचाल सुरू केल्याचं दिसते. दरम्यान, अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आहे. अजित पवारांकडून गृहनिर्माण खात्याची मागणी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही अवाजवी अशा मागण्या करत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच गृहनिर्माण खातं मागितलं होतं. आता नवं सरकार स्थापन होत असताना राष्ट्रवादीने गृहनिर्माण खात्याचा आग्रह धरला आहे. हे खाते आमच्या यादीतील महत्त्वाचे खाते आहे, असंही राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खाते भाजपाचे अतुल सावे यांच्याकडे होत.
महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्याचा निर्धार ; अजित पवारांनी केली मोठी घोषणा
२०२३ साली अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर त्यांच्या गटाला नऊ मंत्रिपदे देण्यात आली होती. यामध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी होती. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आणि संजय बनसोडे यांच्याकडे युवक, क्रीडा आणि बंदरे विकास अशी खाती देण्यात आली होती.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री भाजपाचा असेल असे जाहीर केले होते. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहयला मिळत होतं. तसंच, गृहखात्यावरूनही शिवसेना नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यावरून शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचंही बोललं जातय. त्यावरूनच चर्चा सुरू असल्याचं बोललं जातय.