Download App

Ajit Pawar : इथोनॉलवरील निर्णयानंतर अजितदादांचा शाहंना फोन; वेळ पडल्यास दिल्ली गाठणार

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीच्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बंदी मागे घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान सध्या विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. मात्र ऐन गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हाच मुद्दा आज राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये उपस्थित कऱण्यात आला.

Fighter Teaser Release: ‘देशभक्तीवर आधारित ‘फायटर’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने सी हेवी मोलायसिसपासून आणि बी हेवी मोलायसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. या अगोदरच पंतप्रधानांनी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स करायला देखील परवानगी दिली होती. नितिन गडकरींनी देखील त्याला प्रोत्साहन दिले आहे. मात्र काल अचानक सरकारने साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. त्यावर आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मी पियुष गोयल आणि अमित शाह यांच्याशी देखील संपर्क साधला असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

आंतरवाली सराटीतील लाठीमार बचावात्मक; फडणवीसांच्या उत्तरातून पोलिसांना बळ

पुढे ते म्हणाले की, मी त्यांना सांगितलं आहे की, अनेक कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती न करता साखर निर्मिती केली जाईल अशी व्यवस्थाच नाही. त्याचबरोबर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक कारखान्यांनी या इथेनॉल प्लॅंन्टसाठी कोट्यावधींचं कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळे मी या विषयावर देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद सादला . या प्रश्नासाठी आम्ही दिल्लीला देखील जाव लागलं तर जाणार आहोत. तसेच आपल्याला नितिन गडकरींनी देखील हा प्रश्न सोडवण्यासाठी भेटीचं अश्वासन दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

इथेनॉल निर्मितीवर बंदी का?

केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे जर आहे त्या उसापासून साखर कारखान्यांनी जर साखरे ऐवजी इथेनॉलची निर्मिती केली. तर साखरेची निर्मिती कमी होईल. त्यामुळे साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्मय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र यामुळे साखर कारखान्यांचं नुकसान होणार आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसाच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे.

follow us