मुंबई : जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे काका अजित पवार यांनी अनेकांना फोन करू जीवाचे रान केले होते. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले या निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन करत होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून अजित पवार होते.
काल नाशिकमधील जाहीर सभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्केंनी हा आरोप केला आहे. नरेश म्हस्के म्हणतात अजित पवार साहेब आगोदर आपलं बघा मग मुख्यमंत्र्यांवर टीका करा. तुम्ही रोहित पवारांना पाडण्यासाठी कोणाकोणाला फोन केले. हे जनतेला सांगा मग आमच्यावर टीका करा. आता नरेश म्हस्कें यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस मधून किंवा अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘आता खूप झालं मला टार्गेट केलं जातयं..राज दरबारी न्याय मागणार’, वसंत मोरेंनी नाराजी बोलून दाखवली…
जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक पार पडली. या निवडणुकीत रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मते मिळवत त्यांचे विरोधक अभिषेक बोके यांचा पराभव केला. अभिषेक बोके हे शरद पवार यांच्या बहिणीचे नातू आहेत. म्हणजे अजित पवार यांच्या आत्याचे नातू म्हणूनच रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत होते असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.