Download App

Video : राम शिंदे पराभूत झाले ते बरं झालं; न घेतलेल्या सभेचा उल्लेख करत अजितदादा बोलून गेले

सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.

  • Written By: Last Updated:

नागपूर : विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष कर्जत जामखेड मतदारसंघाकडे लागले होते. या ठिकाणी भाजपचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला. त्यानंतर आज (दि.19) त्यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विधानसभेत शिंदे यांनी पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडले होते. त्यानंतर आज शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या स्टाईलने प्रतिक्रिया देत एकादृष्टीने पराभव झाला ते बरं झालं असे विधान करत पहिल्यांदाच शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. (Ajit Pawar On Ram Shinde)

राम शिंदे सर त्यांना क्लास कसा…; फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा

नेमकं काय म्हणाले अजितदादा?

राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्यानंतर त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील अभिनंदनपर भाषण केले. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेत कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेंनी माझी सभा न झाल्याने त्यांचा पराभव झाल्याची नाराजी बोलून दाखवली होती असा उल्लेख अजित पवार केला.

ते म्हणाले की, सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर, माझी सभा न झाल्याने निवडणूक हारल्याचेदेखील आपण म्हणालात. पण, एकादृष्टीने आपला पराभव झाला ते योग्य झालं कारण, देवेंद्रजींच्या मनात तिथे निवडून आला असता आणि कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्त्वाचे आहे. मात्र, यासाठी गिरीशला त्यासाठी थांबावं लागलं असते आणि शिंदेंना तिथे यावं लागलं असतं असे दादा म्हणाले. दादांच्या या विधानानंतर एकचं हशा पिकला.

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, गमतीचा भाग जाऊद्या पण, आपल्या पराभूत होण्यामुळे आपलं विधानपरिषदेचे सदसत्व कायम राहिले आणि आज आपण एकंदरीत विधानपरिषदेचे नाही तर, संपूर्ण विधिमंडळातील सर्वोच्च मान असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतींना असतो. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना असतो.

Video : संसद परिसरात मोठा राडा; राहुल गांधींनी ढकलल्याने भाजप खासदार जखमी

निलम गोऱ्हेंचेही कौतुक

यावेळी अजितदादांनी मध्यंतरीच्या काळात आमच्या भगिनी निलम ताईंनी स्वतः अस्थाई सभापती म्हणून या ठिकाणी काम केले. त्यांनी काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची ही अस्थाईपदाची कारकिर्द हे सभागृह किंवा आम्ही कुणीच कधीही विसरू शकणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

follow us