Download App

राज्याच्या तिजोरीचा वाढप्या मी आहे; तुम्ही घड्याळाचं बटन दाबा, जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं वक्तव्य

कुणी मायी का लाल संविधान बदलणार नाही. मात्र, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला असा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Jan Sanman Yatra : कुणी मायी का लाल संविधान बदलणार नाही. मात्र, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला आणि आदिवासी, दलित समाजाला भिती दाखवण्याचं काम केलं. मात्र, मी अजित दादा शब्दाचा पक्का आहे. (Jan Sanman Yatra) हा दादाचा वादा आहे. त्यामुळे माझ्या सर्व जनतेला आवाहन करतो आपण असल्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आम्ही काय सत्तेत गोट्या खेळायला गेलोय का?  राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडं आहेत. त्याचा वाढप्या मी आहे असं म्हणत आम्ही अस होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितंलं  ते खेड आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेत बोलत होते.

हिंमत असेल तर कार्यक्रमाला न येणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म सुप्रिया सुळेंचा थेट सरकारला इशारा

तसंच, मस्लिम समाजालाही आम्हाला देशातून बाहेर काढतील की काय अशी भिती वाटली. मात्र, सारथी, बारटी, महाज्योती अशा योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत. तसंच, वक्फ बोर्डाच्या बिलात काही अडचणीचं होणार असेल तर आम्ही होऊ देणार नाहीत असंही अजित पवार म्हणाले. तसंच, आम्ही जी लाडकी बहीण योजना आणली ती महिलांना स्वातंत्र्य, मान, सन्मान आणि स्वालंबी होता यावं यासाठी ही योजना आणली आहे. तसंच, अर्थसंकल्पात ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी जन सन्मान यात्रा सुरू केली आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल

 

विरोधकांनी टीका केली. काही कोर्टात गेले. मात्र, आम्ही कुणाचं ऐकलं नाही. त्यामुळे कुमी मायका लाल पैसे वापस घेणार नाही. अस जर कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. मग चिक्की पिसींग पिसींग होणार असंही अजित पवार म्हणाले आहेत.  त्यामुळे तुम्ही आम्हला तुम्ही साथ द्या असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे. तसंच, कुणाच्या कुठल्या वक्तव्यांना बळी पडू नका असं म्हणत महायुतीला साथ द्या असंही अजित पवार म्हणाले आहेत.

follow us