Video : नाशिकमध्ये अजितदादांची बुलेट सवारी; म्हणाले, तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन…

  • Written By: Published:
Video : नाशिकमध्ये अजितदादांची बुलेट सवारी; म्हणाले, तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन…

नाशिक : एरवी स्पष्ट विधानांमुळे चर्चेत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपण तारूण्यात अनेक जणींना बाईकवरून फिरलो आहे असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान आणि त्यांचा बुलेटस्वारीच्या (Bullet) व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाशिक जिल्ह्यातील जन सन्मान यात्रेच्या कार्यक्रमापूर्वी माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar Bullet Ride In Nashik Sinnar )

अजित पवारांवर टीका करणं टाळा, आम्हाला त्यांची गरज; भाजप नेत्यांची संघाला विनंती

आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमिवार सर्वच राजकीय पक्षांकडून जनसंपर्क वाढवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जन सन्मान यात्रेचे (Jan Sanman Yatra) आयोजन करण्यात आले आहे. ही यात्र आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये असून, कार्यक्रमापूर्वी अजितदादांनी कार्यकर्त्यांसमवेत बुलेट स्वारीचा आनंद घेतला. यावेळी त्यांना बुलेट स्वारीचा आनंद घेताय कसं वाटतयं असं विचारले असता ते म्हणाले की, ये भी अनुभव लेना चाहिये असे उत्तर दिले.

आता ‘ही’ चूक पुन्हा होणार नाही; लोकसभेला कंबर मोडली, अजित पवारांची जाहीर माफी

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, मी कॉलेज जीवनामध्ये आणि शेती करत असताना मी मोटार बाईक चालवायचो. मला मोटार बाईकवर फिरायला आवडतं पण सुरक्षेच्या कारणामुळे अडचणी येतात पण आज मी बाईकवर बसल्याचे ते म्हणाले. तारूण्यात बाईकवरून भरपूर फिरल्याचे सांगत बऱ्याच जणींना घेऊन फिरल्याचे अजितदादांनी हसत हसत सांगितले. त्यामुुळे सध्या अजितदादांच्या या विधानाची आणि त्यांच्या बुलेट स्वारीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभेसाठी अजित पवारांचं ‘पिंक’ पॉलिटिक्स

जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेमुळे महिलांची मतं आम्हाला मिळू शकतात, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना आहे. म्हणूनच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या जनसन्मान यांत्रेत अधिकाधिक गुलाबी रंग वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करत आहेत. यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान करत असल्याचे दिसून येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube