चांदीची गदा, स्कॉर्पियो, 25 बुलेट बक्षीस; या जिल्ह्यात रंगणार 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

चांदीची गदा, स्कॉर्पियो, 25 बुलेट बक्षीस; या जिल्ह्यात रंगणार 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

Maharashtra Kesari : पैलवानांसाठी कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. लाल माती आणि मॅट या दोन गटात स्पर्धा होणार आहेत. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Association)पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे वेळापत्रक लवकर जाहीर केलं जाणार आहे. या स्पर्धेत मानाची चांदीची गदा, स्कॉर्पियो गाडी, 25 बुलेट, रोख रकमेची विविध बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. धाराशिव (dharashiv)शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम(Tuljabhawani District Stadium) येथे या स्पर्धा होणार आहेत.(maharashtra 65th maharashtra kesari wrestling competition organize in dharashiv)

Crime : धक्कादायक ! कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याकडून एमडी अन् सीईओची हत्या…

आज धाराशिवमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त विजेते काकासाहेब पवार, हातलाई कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील, भारतीय खो खो महासंघाचे सचिव चंद्रजीत जाधव, अभिराम व आदित्य सुधीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीचा काँग्रेस डाव साधणार; अशोक चव्हाणांनी मनसुबे सांगितले

धाराशिव आणि लातूर जिल्हा एकत्र असताना 25 नोव्हेंबर 1969 साली लातूर शहरात डालडा मैदान येथे या स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना मानाची चांदीची गदा मिळाली होती. ते महाराष्ट्र केसरी ठरले होते. त्यानंतर आता यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद हे धाराशिव जिल्ह्याला मिळाले आहे. महाराष्ट्रातील कुस्ती खेळाडूंना यात संधी मिळणार असून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

लाल माती व गादी अश्या 20 विविध वजनाच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. 45 संघ असून 900 खेळाडू, 150 पंच, तांत्रिक अधिकारी सहभागी असणार आहेत. 50 हजार ते 1 लाख प्रेक्षक रोज या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. कुस्ती खेळाडू व कुस्ती प्रेमींसाठी हा एक प्रकारचा कुंभ मेळाच असतो. धाराशिव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube