महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी; नाना पटोलेंची खोचक टीका
Nana Patole News : महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलीयं. दरम्यान, अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी अजित पवार गुलाबी जॅकेटसह गुलाबी बसने प्रवास करीत आहेत. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी टीका केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
Old Money: एपी ढिल्लॉनच्या गाण्यात भाईजानचा जबरदस्त ॲक्शन सीन, संजू बाबाने जिंकली चाहत्यांची मन
नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असून या अळीपासून नुकसान होणार आहे. मला गुलाबी रंगाबद्दल बोलायंच नाही पण गुलाबी रंगाचा प्रादुर्भाव होतो. प्रसिद्धीसाठी 270 कोटींचा जो खर्च केला जातो, तो जनतेचा पैसा उडवून नये ही आमची भूमिका असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.
“सरकार आल्यास लाडकी बहिण योजना सुरुच ठेवणार पण..” जयंत पाटलांनी आज कन्फर्मच केलं
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूका लढणार असून महायुतीने फुले- शाहू-आंबेडकरांचा विचार कलंकित केला आहे. त्यांना सत्तेतून उतरवण्याचा आमचा निर्धार आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाने काय निर्णय घ्यायचे तो त्यांचा अधिकार असून तेच ठरवणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय.
महायुतीत ट्विस्ट! निवडणुकीआधीच वेगळ्या वाटा, आज ‘या’ नेत्याकडून नव्या आघाडीची घोषणा?
तसेच देवेंद्र फडणवीसांच्या 2014 ते 2019 काळात भाजपप्रणित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या भ्रष्टाचाराचे कागदे आमच्याकडे पुराव्यासहित आहेत. त्यांनी सुरुवात करावी त्यानंतर आम्ही सुरुवात करु, राज्याला लुटणारी ही व्यवस्था सत्तेत आहे, त्यांना चक्की पिसिंग करायला लावणार असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिलायं. तर विरोधकांनी राज्याला बेरोजगारीच्या खाईमध्ये टाकलं आहे, अत्याचारी भ्रष्ट व्यवस्थेला कशी पिसिंग करायची याचं औषध आमच्याकडे असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.