“सरकार आल्यास लाडकी बहिण योजना सुरुच ठेवणार पण..” जयंत पाटलांनी आज कन्फर्मच केलं
Jayant Patil : आता निवडणुकीत अनेक जण तुमच्याकडं येतील तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हासमोरचं बटण दाबा. नाहीतर या योजना बंद पडतील. मी तुम्हाला सांगतो विचार न करता सुरू केलेल्या काही योजना राज्यात आहेत. पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे तुम्ही कुणीही काळजी करू नका. महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी दिली. एकप्रकारे त्यांनी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना मविआचं सरकार आलं तर पुढे सुरुच ठेवली जाणार असल्याचं सांगितलं.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी बोलतांना जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. जयंत पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील आताच्या सरकारला घालवण्यासाठी या सरकारला शेवटचा धक्का देण्यासाठी आजपासून ही यात्रा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने काय चमत्कार घडला हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं.
Video : ट्रॉली बिघडली अन् उपस्थितांना भरली धडकी; जयंतराव-रोहिणीताई बचावल्या, कोल्हेंना दुखापत
विधानसभेच्या निवडणुक दोन अडीच महिन्यांत होतील. माझा असा अंदाज आहे की हे सरकार थोडसं घाबरलेलं आहे. म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्याऐवजी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर घेतील. त्यांना जास्त वेळ पाहिजे. तिजोरीतले सगळे पैसे वाटून झाल्यावर लोकांसमोर जायचं अशी मानसिकता त्यांची आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे या महाराष्ट्रानं गद्दारांना कधीच माफ केलेलं नाही. फसवणाऱ्या माणसाचा मराठी माणसाला नेहमीच राग आहे. जो फसवतो त्याच्या विरोधात येथील माणसं उभी राहिली हा इतिहास आहे.
महाविकास आघाडी एकत्र आहे. ही यात्रा आमच्या पक्षाच्या वतीने काढली असली तर पुढे यात्रेत आघाडीतील घटक पक्ष सहभागी होऊन आम्हाला साथ देणार आहेत. लोकसभे काय घडलं हे आपण पाहिलं. पाऊस पडतो हे माहिती होतं पण पैशांचा पाऊस पडतो हे माहिती नव्हतं. ह्या लोकांनी लोकसभेची नगरपालिका केली अशी यांची पद्धत आहे. पण पैशाला महाराष्ट्र कधी नमला नाही, झुकला नाही म्हणून राज्यात मविआच्या 31 जागा जनतेनं निवडून दिल्या.
आता सर्वांना विनंती आहे. आता निवडणुकीत अनेक जण तुमच्याकडं येतील तुम्हाला सांगतिल आम्ही सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हासमोरचं बटण दाबा. नाहीतर या योजना बंद पडतील. मी तुम्हाला सांगतो विचार न करता सुरू केलेल्या काही योजना राज्यात आहेत. पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे तुम्ही कुणीही काळजी करू नका. महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण या लाडकी बहिण योजनेला सरकारने बजेटमध्ये हेड सुद्धा काढलेलं नाही.
मी जिंकलो आणि हरलो तरी चिंतन करतो, मात्र निवडणुकांतील घोडेबाजार चिंतेचा विषय -जयंत पाटील
यावर आम्ही जास्त बोलणार नाही. या योजनांसाठी पैसा खिशातून नाही तर तिजोरीतून दिला जाणार आहे. या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे. फक्त हे करताना आदिवासी विभाग आणि मागासवर्गीय विभागाच्या योजनांचे पैसे कमी करू नका असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवर अप्रत्यक्ष टीकाच केली आहे. आता या टीकेला महायुतीचे नेते कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.