Video : ट्रॉली बिघडली अन् उपस्थितांना भरली धडकी; जयंतराव-रोहिणीताई बचावल्या, कोल्हेंना दुखापत

Video : ट्रॉली बिघडली अन् उपस्थितांना भरली धडकी; जयंतराव-रोहिणीताई बचावल्या, कोल्हेंना दुखापत

Pune News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने महाविकास आघाडी (Maharashtra Elections) आणि महायुतीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar) शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन (Pune) झाला. शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर क्रेनची ट्रॉली खाली येत असताना अचानक या ट्रॉलीत बिघाड झाला. या ट्रॉलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहणी खडसे आणि मेहबूब शेख असे चौघे होते.

Pune Rain Update: खडकवासलातून 45 हजार क्युसेकने विसर्ग; महापालिकेकडून संपर्क क्रमांक जाहीर

क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्याने एका बाजूला कलली त्यामुळे उपस्थितांना चांगलीच धडकी भरली. परंतु, नंतर क्रेन चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने शांततेने हळूहळू ट्रॉली खाली घेतली. हा प्रसंग पाहत असताना येथे जमलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. ट्रॉलीतील नेते मंडळीही ट्रॉलीच्या लोखंडी अँगलला पकडून उभी होती. या घटनेत सुदैवाने सर्वजण बचावले. खासदार अमोल कोल्हेंना मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली. ट्रॉलीचा नट निसटल्याने ट्रॉली एका बाजूला कलली अशी चर्चा येथे सुरू होती.

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी दोन महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे आणि यात्रा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची आजपासून सुरुवात झाली आहे.या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नेते करणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांची जनसन्मान यात्राही महाराष्ट्र पिंजून काढत आहे.

या दोन्ही पक्षांनी यात्रांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आता या प्रयत्नात कुणाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

follow us
  • fb
  • instagram
  • youtube