Download App

मनातील मुख्यमंत्री ‘अजितदादा’ म्हणणारे देवेंद्र भुयारही फिरले… शरद पवारांना अपक्ष आमदारांचे पाठबळ

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अशातच मनातील मुख्यमंत्री ‘अजितदादा’ म्हणणारे देवेंद्र भुयार हे अजित पवार गटामध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता ते आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवारांच्या बैठकीसाठी वायबी सेंटरला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता अपक्ष आमदारांचे पाठबळ देखील शरद पवारांना असल्याचं पाहायला मिळत आहे. ( Ajit Pawar Supporter Devendra Bhuyar with Sharad Pawar in NCP Political Crisis )

मनावर दगड ठेवून निलेश लंकेंनी निर्णय घेतला… अजितदादांच्या गोटात दाखल

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुयार हे अजित पवार यांच्या गटातील समजले जात होते. त्यांनी अनेकदा अजितदादांचं कौतुकही केलं होतं. अपक्ष आमदारांना फक्त निवडणुकीपुरतं स्थान असतं. नंतर त्यांच्या निधीबाबत किंवा इतर प्रश्न सोडवले जात नाहीत. मात्र, आम्हाला केवळ एकच आधार आहे, तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा माळा, अजित पवार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नाहीत. अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे सक्षम आहेत. पण माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार आहेत. ते मुख्यमंत्री झाले तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल, असं देवेंद्र भुयार म्हणाले होते. मात्र आता ते शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या गटामध्ये असणारे आमदार हळुहळू परत फिरत आहेत. त्यात आता देवेंद्र भुयारही सामील झाले आहेत. अगोदर ते अजित पवार गटामध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

Movies Releasing This Week: ‘आठवणी’ ते ‘७२ हुरें’; जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!

कोण आहेत देवेंद्र भुयार?

देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार आहेत. अगोदर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होते. मात्र त्यावेळी देखील ते राष्ट्रवादीच्या जवळचे असल्याच्या मुद्दयावरून त्यांच्यात आणि पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाले. त्यातून भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात.

Tags

follow us