Movies Releasing This Week: ‘आठवणी’ ते ‘७२ हुरें’; जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!

Movies Releasing This Week: ‘आठवणी’ ते ‘७२ हुरें’; जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!

Movies Releasing This July Week: जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाहत्यांना आता मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. हिंदीच आणि मराठी सिनेमाही या आठवड्यात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु सध्या पावसाचे वातावरण पाहता केवळ मेजवानी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत, परंतु ओटीटीवर मात्र मनोरंजनाची बरसात होणार असल्याचे दिसून येणार आहे. अनेक सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहेत. चला तर मग या आठवड्यामध्ये नेमके कोणते सिनेमा रिलीज होणार आहेत पाहुयात

आठवणी
गेल्या काही दिवसांपासून ‘आठवणी’ हा सिनेमा चांगलंच चर्चेत आहे. या सिनेमात एक थोडी वेगळीच लव्हस्टोरी चाहत्यांना बघायला मिळणार आहे. कथेच्या शोधामध्ये निघालेला तो आणि या प्रवासात त्याला गवसलेली भावनिक गुंतागुंत आणि ओढ व त्यातून साकारली गेलेली एक रंजक प्रेमकथा म्हणजे ‘आठवणी.’ दोन पिढ्यांची प्रेमकथा या सिनेमामधून दाखविले जाणार आहे. तर दुसरीकडे दिग्गज कलाकार आणि नवोदित कलाकारांचे सुंदर असे समीकरण या सिनेमात चाहत्यांना बघायला मिळणार आहे.‘आठवणी’ हा सिनेमा ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.‘आठवणी’ हा सिनेमा ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

७२ हुरें
‘द केरळ स्टोरी’ या विवादित सिनेमानंतर आता ‘७२ हुरें’ हा सिनेमा आता रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा ब्रेनवॉश करून आत्मघातकी बॉम्बर्स बनणाऱ्या तरुणांभोवती फिरते असल्याचे दिसून आले आहे. ‘७२ हुरें’ हा सिनेमा २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिद्ध दिग्दर्शक संजय पूरण सिंह फिल्म्स यांनी दिग्दर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा आता वादाच्या भवऱ्यात सापडला असता तरी एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, काश्मिरी आणि आसामी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि आमिर बक्षी हे मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. ७ जुलैला हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

नीयत
अभिनेत्री विद्या बालन गुप्तहेर म्हणून परत एकदा पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नीयत’ या सिनेमात विद्या बालन या सिनेमात  गुप्तहेर बनली आहे. या सिनेमामध्ये विद्या बालनचा एकदम झक्कास लूकमध्ये दिसून येणार आहे. या सिनेमाची कथा एका खुनाभोवती फिरत असल्याचे चाहत्यांना दिसून येणार आहे. या तपासामध्ये अनेक पात्रे संशयाच्या भोवऱ्यात येत आहेत, परंतु विद्या बालनला खरा खुनी कोण हे शोधण्यासाठी काम सोपवले गेले आहे. या सिनेमामध्ये विद्या बालनने मीरा राव नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. विद्या बालनचा हा सिनेमा ७ जुलैला सिनेमागृहामध्ये आणि ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

ब्लाइंड
सोनम कपूरचा हटके अंदाजात सिनेमा ‘ब्लाइंड’ ७ जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. शोम मखिजा दिग्दर्शित ‘ब्लाइंड’ हा त्याच नावाच्या कोरियन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात सोनम एका दृष्टिहीन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

आयबी ७१
विद्युत जामवालचा ‘आयबी ७१’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अगोदरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘आयबी ७१’ ही एक पीरियड फिल्म असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये भारत-पाक युद्धाच्या दरम्यानची एक महत्त्वाची रंजक घटना दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अनुपम खेरही एका खास भूमिकेमध्ये दिसून आले आहेत.

तरला
हुमा कुरेशी अभिनित ‘तरला’ हा प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांचा बायोपिक ७ जुलै रोजी ‘ZEE5’वर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पियुष गुप्ता दिग्दर्शित सिनेमात शारीब हाश्मीने तरला यांच्या पतीची भूमिका साकारली असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube