“खारघरची पुनरावृत्ती होणार नाही, याची…” बारसू रिफायनरीवरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं

“खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा.” अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. […]

ajit pawar

ajit pawar

“खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा.” अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली आहे. मात्र या अटकेविरोधात आता विविध संघटना मैदानात उतरल्या आहेत.

Bhima Patas : राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार?; मोदी अन् ED ला टॅग करत राऊतांची CBI कडे तक्रार

त्यांनी एका पत्राद्वारे या अटकेचा निषेध करत या आंदोलकांना तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेंच्या रिफायनरी विरोधी ठराव असूनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन सर्वेक्षण करण्यास सरकार प्रचंड पोलीस बळाचा वापर करत आहेत. या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता सरकारला सुनावलं आहे.

अजित पवार यांनीही लिहलं आहे की, “रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.”

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

बारसू हत्याकांड घडवायचं आहे का?

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याच्या विरोधात टीका केली आहे. ते म्हणाले की बारसू रिफायनरीविरोधात प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सर्व्हेला नागरिकांनी विरोध केल्यानंतर त्याला अटक केली जात आहे. उद्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जाईल. सरकारला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं बारसू हत्याकांड घडवायचं आहे का? असा गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे लक्ष घालणार ?

या सगळ्या आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली की उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेतली असून वेळ आली तर आम्हाला तिथं जावे लागेल म्हणत सरकारला इशारा दिला आहे.

Exit mobile version