Download App

जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, माझी राजकीय वाढ होऊ न देण्यात…

अजित पवार असे नव्हते. ते सध्या कुणाच्या दबावात आहेत हे कळायला मार्ग नाही. कारण इतक काही ते सहन करणारे नाहीत. मात्र, धनंजय मुंडे

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad on Ajit Pawar : संतोष देशमुख प्रकरणात थेट वाल्मिक कराड अटक असताना त्यांचे कर्तेकर्वेता म्हणून धनंजय मुंडे यांच नाव येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार का इतके शांत बसले आहेत हे काही कळायला मार्ग नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवर टीका केली आहे. (Jitendra Awhad) तसंच, त्यांनी अजित पवार यांच्या स्वभावावरही भाष्य केलं आहे.

Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

अजित पवार असे नव्हते. ते सध्या कुणाच्या दबावात आहेत हे कळायला मार्ग नाही. कारण इतक काही ते सहन करणारे नाहीत. मात्र, धनंजय मुंडे यांच्याबाबत ते काही निर्णय घ्यायला तयार नाही. त्याचबरोबर त्यांनी पक्षात असताना अजित पवार काय वागले याचाही दाखला दिला आहे. आव्हाड म्हणाले, माझी राजकीय वाढ होऊ नये यासाठी कायम अजित पवार यांनी प्रयत्न केले असा थेट आरोप केला आहे. तसच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी पालकमंत्री होऊ नये यासाठी सर्वात जास्त मनापासून प्रयत्न ज्यांनी केले ते नेते म्हणजे अजित पवार असा थेट घणाघात आव्हाड यांनी केला आहे.

follow us