Jitendra Awhad : “मुद्दाम रात्री ट्विट करतोय, ‘महानंद’ प्रकल्प गुजरातला”.. आव्हाडांचा संताप

Jitendra Awhad : “मुद्दाम रात्री ट्विट करतोय, ‘महानंद’ प्रकल्प गुजरातला”.. आव्हाडांचा संताप

Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून खळबळजनक माहिती दिली आहे. महानंद गुजरातला विकल्याचा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे. दरम्यान, महानंदचे चेअरमन राजेश पजरणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी दूध व्यवस्थाकीय संचालकांकडे परजणे यांचा राजीनामा पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

‘मुद्दामहून रात्री ट्विट करत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आह, असं म्हणाल! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय! जय हो, महानंद की!’ असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Sanjay Raut : तुकाराम मुंडेंचे नाव घेत राऊतांनी सांगितला ‘महानंद’ वाचवण्याचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरून मधल्या काळात राजकारणाचा पारा चढला होता. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. सत्ताधारी मंडळींकडूनही यावर खुलासा देण्यात आला होता. आर्थिक घडी विस्कटल्याने एनडीबीबीच्या ताब्यात महानंदचा कारभार जाईल असे सांगितले जात आहे.

राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, महानंदचं महाराष्ट्रात अस्तित्व राहावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून आता विरोधक पुन्हा आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. या विरोधाची सुरुवात जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली आहे.

मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच…; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित

दरम्यान, याआधी महानंदचे दीडशे कोटी रुपये ठेवी शिल्लक होत्या तसेच गतवर्षी अजितदादांनी दूध पावडरचे 80 कोटी रुपये शासनाचे माफ केले आता हे सर्व पैसे संपले आहेत म्हणून महानंद एनडीबीबीला देण्याचा डाव आहे, असा आरोपही काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.  एनडीबीबीला 350 कोटी रुपये शासन देणार आहे त्याऐवजी 125 कोटी कर्मचारी व्हीआरएससाठी महानंदला दिले तर महानंद अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकते व एनडीबीबीच्या ताब्यात जाण्यापासून वाचू शकते, असा सल्लाही राऊत यांनी दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज