वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की, वेग थंडावतो, त्याला मंत्री महोदयांचा वरदहस्त; संदीप क्षीरसागरांचा आरोप

  • Written By: Published:
वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की, वेग थंडावतो, त्याला मंत्री महोदयांचा वरदहस्त; संदीप क्षीरसागरांचा आरोप

Sandeep Kshirsagar : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.

Delhi Assembly Elections 2025: मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक 

वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.

संदीप क्षीरसागर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, वाल्मिक कराडला सुरूवातीपासून संरक्षण आहे. सध्या माध्यमांतून ज्या गोष्टी समोर येत आहेत. प्रॉपर्टीचा जो खुलासा होतोय, तसेच बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतात, त्यावरून वाल्मिक कराडचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत? हे लक्षात येतं. कराडला अटक व्हायला उशीर झाला आणि अटक झाल्यानंतरही जे काही कट कारस्थान आहे, त्यातही अजून त्याचं नाव आलेलं नाही. त्यामुळं मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगत आहे की मास्टरमाइंड वाल्मिकी कराड आहे, पण वाल्मिक कराडला संरक्षण धनंजय मुंडेचं आहे, हे स्पष्ट दिसतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.

Ladki Bahin Yojana : जेव्हा मतं घेतली तेव्हा त्रुटी माहित नव्हत्या का?, पटोलेंचा सरकारला संतप्त सवाल 

पुढं ते म्हणाले की, तुरुंगात वाल्मिकी कराडला वेगळी ट्रीटमेंट दिले जाते. वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासाचा वेग थंडावतो. हे सगळं महाराष्ट्र पाहत आहे. जर घटनेच्या कालावधीमधील मोबाईलचे सीडीआर तपासले तर कराडच्या खात्याचे ट्रांजेक्शन तपासले तरी कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, हे लक्षात येईलं, असं क्षीरसागर म्हणाले.

कराडवर मंत्री महोदयांचा वरदहस्त
वाल्मिक कराडने हशत करून करोडोंची संपत्ती जमवल्याचा आरोप होतोय. आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे पुण्यापाठोपाठ सोलापुरातही शेतजमीन असल्याची माहिती आता उघडकीस आली. सोलापूर जिल्ह्यात ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. याविषयी विचारलं असता क्षीरसागर म्हणाले की, आतापर्यंत ईडीने वाल्मिकी कराड यांच्या मालमत्तेची चौकशी करायला हवी होती. पण वाल्मिक कराडवर मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे, असं क्षीरसागर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube